एक्स्प्लोर

Bhandara: खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलगा जखमी; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Bhandara News: पँटच्या खिशातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच मुलाने मोबाईल काढून बाहेर फेकल्यानं दुर्घटना टळली आहे.

भंडारा: खिशात ठेवलेल्या मोबाईलमध्ये अचानक बिघाड झाल्यानं स्फोट (Mobile Blast) झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात घडली. या घटनेत चांदपूर येथील 12 वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा मुलगा जखमी झाला. मुलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे.

नेमकं काय घडलं?

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या प्रीतमच्या वडिलांचं प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या आवारात पूजा साहित्य विक्रीचं दुकान आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं प्रीतम नेहमीप्रमाणे वडिलांच्या दुकानात गेला. जाताना सोबत वडिलांचा विवो कंपनीचा मोबाईल त्याने पँटच्या खिशात टाकला आणि तो दुकानाकडे निघाला. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर त्याला पँटच्या खिशातून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. खिशात ठेवलेल्या मोबाईलमधून धूर निघत असल्याची जाणीव त्याला झाली. हा प्रकार लक्षात येताच प्रीतमने खिशात हात घालून तातडीने मोबाईल बाहेर काढला आणि फेकला.

मोबाईल खिशातून बाहेर काढताच स्फोट झाला 

दरम्यान, मोबाईलचा स्फोट झाला, पण यात प्रीतमचं नशीब बलवत्तर असल्याने मोबाईल बाहेर काढल्यानंतर तो फुटला आणि मोठी दुर्घटना होता होता वाटली. मात्र, पँटच्या खिशात मोबाईलने पेट घेतल्याने त्याच्या पायाला जखम झाली, यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला मदत करून तातडीने खासगी रुग्णालयात नेत उपचार केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, मोबाईलचा स्फोट झाल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादमध्येही काही दिवसांआधी घडला असाच प्रकार

औरंगाबादच्या गंगापूर शहरात 11 ऑगस्टला एक धक्कादायक प्रकार घडला. क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने खळबळ उडाली. मोबाईल चार्जिंग झाल्यावर हा 17 वर्षीय विद्यार्थी क्लाससाठी निघाला होता. दरम्यान अचानकच विद्यार्थ्याच्या खिशातील मोबाईलचा आवाज होऊन स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेत विद्यार्थ्याचा पाय भाजला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

बीडमध्ये देखील घडली मोबाईलमुळे दुर्घटना

दरम्यान, असाच काही प्रकार गेल्या जुलैमध्ये देखील बीड जिल्ह्यातून समोर आला होता. बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट होऊन सात वर्षाच्या मुलाचं तोंड भाजलं होतं. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी धारूर येथे घडली होती. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देताना विचार करण्याची गरज आहे. अनिकेत सोळंके असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव होतं. तर, त्याच्या तोंडाला गंभीर ईजा झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धक्कादायक! क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट; औरंगाबादमधील घटना

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांनी दाखवलेली क्लिप AI च्या माध्यमातून तयार केलेली, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :  परिणय फुके
जरांगे पाटलांनी दाखवलेली क्लिप AI च्या माध्यमातून तयार केलेली, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :  परिणय फुके
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
Bhandara Food Poisoning : दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
Nana Patole: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री, टायगर श्रॉफवरील हल्लावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल; म्हणाले, महाराष्ट्र कधीच विसरणार नाही!
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री, टायगर श्रॉफवरील हल्लावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल; म्हणाले, महाराष्ट्र कधीच विसरणार नाही!

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget