एक्स्प्लोर

वेदनादायी! मुलाचा दहावीचा पेपर अन् वडिलांचा मृत्यू, पेपरनंतर केले अंत्यसंस्कार

SSC Exam : वडिलांच्या मृत्यूचं दुःख मनात असतानाही दहावीचा भूमिती विषयाचा पेपर सोडवला.

Bhandara Latest News update : अचानक प्रकृती बिघडल्यानं भास्कर तुपट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरात वडिलांचा मृतदेह असताना मुलगा ओमकार याचा दहावीचा भूमिती विषयाचा पेपर ( SSC Exam 2023 ) होता. वडिलांच्या मृत्यूचं दुःख मनात असतानाही मन मोठं करून मुलगा ओमकार याला कुटुंबीयांनी धीर दिल्यानं दहावीचा पेपर दिला. हा प्रकार भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथं घडला. दरम्यान असाच प्रकार 6 मार्चला सोनी इथं घडला होता.

भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील ओमकार तुपट हा लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे.  बुधवारी सकाळी 11 वाजता त्याचा भूमिती विषयाचा पेपर होता. दरम्यान, पाच दिवसांपासून ओमाकरचे वडील भास्कर यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळं त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरच्या माध्यमातून औषोधोपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्यानं त्यांचं बुधवारी सकाळी अचानक निधन झालं. दरम्यान, ओमकारने वडील गेल्याने हंबरडा फोडला. याचवेळी कुटुंबियांनी ओमकारचा दहावीचा पेपर असल्याने वर्ष वाया जावू नये, म्हणून त्याला धीर देत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करत परीक्षा केंद्रावर पाठविले.

दरम्यान, ओमकार याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृतदेह घरी असल्याची माहिती परीक्षा केंद्रावरून ( SSC Exam 2023 ) शिक्षकांना मिळाली. त्यांनीही ओमकारला धीर देत परीक्षेला बसवले. अगदी मनावर ताबा ठेवत त्याने भूमितीचा पेपर दिला. या प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले. 

आधी पेपर नंतर अंत्यसंस्कार -

कुटुंबीयांनी दिलेल्या भक्कम धीरानंतर ओमकरनं मी परीक्षा देवून येतो, तोपर्यंत वडिलांवर अंत्यसंस्कार करू नका, असं म्हणत घरून परीक्षा केंद्रावर पोहचला. तोपर्यंत कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी करून ठेवली. तीन तासानंतर ओमकार जेव्हा पेपर देवून घरी परतला, तेव्हा त्यानं वडिलांचा मृतदेहाला जवळ घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचे रडणे बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

याआधीही घडली होती अशीच घटना 

यापूर्वी 6 मार्च रोजी येथील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात असाच प्रकार घडला होता. वडिलांचा मृतदेह घरी असताना प्राची राधेश्याम सोंदरकर हिने दहावीचा पेपर दिला होता. घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार, संवर्ग विकास अधिकारी जी. पी. अगर्ते हे भरारी पथकासह परीक्षा केंद्रावर जावून त्यांनी ओमकरला धीर दिला होता.  

आणखी वाचा :
कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान, पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget