एक्स्प्लोर

Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!

Samsung ने अगदी कमी किंमत आणि भरपुर फिचर्स असे 3 फोन भारतात लाँच केले.

Samsung New 4G Phone Launch : Samsung ने भारतात आपले तीन नवीन 4G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07. हे तीनही फोन्स डिझाइन आणि फीचर्समध्ये जवळजवळ एकसारखेच आहेत. या फोन्समध्ये 6.7 इंचाचा HD Plus PLS LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Helio G99 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही मिळतो.

या सीरिजमधील सर्व फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसोबत येतात. स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येतं. सॉफ्टवेअरबाबत हे फोन्स Android 15 वर आधारित One UI 7 वर चालतील आणि Samsung ने या उपकरणांसाठी 6 मोठे OS अपडेट्स देण्याचे घोषित केलं आहे.

बॅटरी पॅावर तगडी की कमकुवत?

बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर या तीनही फोन्समध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनला IP54 रेटिंग मिळालंय, ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून थोड-फार संरक्षण मिळतं. वजन फक्त 184 ग्रॅम असल्यामुळे हे फोन्स हलके आणि वापरण्यास सोपे आहेत.

काय असेल या फोन्सची किंमत?

किमतींच्या बाबतीत Galaxy A07 ची किंमत 8,999 रुपये आहे आणि हा फोन Samsung Store वर उपलब्ध असेल. Galaxy F07 ची किंमत 7,699 रुपये असून तो Flipkart वर विकत घेता येईल. Galaxy M07 ची किंमत 6,999 रुपये आहे आणि तो Amazon वर एक्सक्लुझिव्ह असेल. या तीनही मॉडेल्समध्ये ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायोलेट असे तीन कलर ऑप्शन्स मिळतील. जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल ज्यात बॅटरी, कॅमेरा आणि परफॉर्मन्सचा चांगला बॅलन्स मिळतो, तर Samsung चे हे नवीन A07, F07 आणि M07 मॉडेल्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.

हेही वाचा 

Upcoming Cars : 10 लाखांपर्यंत कार घ्यायचीय? लवकरच मार्केटमध्ये येताय हायब्रिड इंजिन अन् सनरूफसह जबरदस्त SUVs; पाहा संपूर्ण यादी

महत्त्वाच्या बातम्या

गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त

Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा

Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी

श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार

Embed widget