'या' दिवशी लॉन्च होणार Royal Enfield ची नवीन बाईक, किंमत असेल...
स्वदेशी प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच आपली नवीन Scram 411 बाईक भारतात लॉन्च करणार आहे.
स्वदेशी प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच आपली नवीन Scram 411 बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी आपली ही नवीन बाईक 15 मार्चला भारतात लॉन्च करू शकते. स्क्रॅम 411 ही बाईक दैनंदिन वापराच्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. हा कंपनीच्या लोकप्रिय बाईक हिमालयन ADV चा टोन्ड-डाउन प्रकार असेल. हा हिमालयनचा रोड-ओरिएंटेड व्हेरिएंट मनाला जात आहे. बाजारात याची स्पर्धा JAWA Perak, Honda Hness CB350, Honda CB350 आणि Benelli Imperiale 400 या बाईकशी होईल.
Scram 411 मध्ये स्प्लिट सीट नसून सिंगल पीस सीट असेल. हिमालयनमध्येही हेच पाहायला मिळते. याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर Meteor 350 सारखा असू शकतो. ही बाईक दोन वेगळ्या कलर टोनसह उपलब्ध होणार आहे. रेड/ब्लू हायलाइट्ससह ब्लॅक रंगात आणि रेड/ब्लू रंगाचे हायलाइट्स असलेले व्हाईट रंग यामध्ये मिळू शकतात.
इंजिन आणि किंमत
Royal Enfield Scrum 411 मध्ये Royal Enfield Himalayan पेक्षा लहान चाके मिळू शकतात. रॉयल एनफिल्ड हिमालयनमध्ये 21-इंच चाके वापरण्यात आली आहेत तर स्क्रम 411 मध्ये 19-इंचाची चाके दिली जाऊ शकतात. तसेच याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 411cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळू शकते, जे 24.3 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये हिमालयन ट्रान्समिशनचा वापर केला जाऊ शकतो. कंपनी Scrum 411 ची किंमत 1.90 लाख (एक्स-शोरूम) रुपये ठेवू शकते. दरम्यान, कंपनी यावर्षी हंटर 350 आणि शॉटगन 650 (SG650) देखील लॉन्च करू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
इस तारीख को लॉन्च होगी Royal Enfield की नई बाइक, करीब 1.90 लाख रुपये हो सकती है कीमत
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero