एक्स्प्लोर

Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज

Anand Mahindra : मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या देशांत जातात. रशिया युक्रेनमध्येही भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

Anand Mahindra : गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सातत्याने युद्ध सुरु आहे. याच युद्धाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही झाला आहे. रशिया युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या युद्धात आतापर्यंत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra Chairperson of Mahindra and Mahindra) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच भारतात वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) सुरु करणार अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून दिली आहे. 

या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, "भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे याची मला कल्पना नव्हती.  @C_P_Gurnani आपण मेडिकलच्या अभ्यासासाठी महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज सुरु करू शकतो का?" अशी माहिती दिली आहे. टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना त्यांनी टॅग केले आहे. 

भारतातून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे. तसेच, बरेचसे विद्यार्थी पैशांच्या कमतरतेमुळे अशा रशिया युक्रेनसारख्या छोट्या छोट्या देशांत शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. या सगळ्या तणावात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच त्यांना आपल्या मायदेशात राहून शिक्षण घेता येणार आहे.  

युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरूच 

युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याचे अभियान सुरू आहे. आज, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाची दोन सी-17 विमाने रोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीमधील बुडापेस्ट येथून गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर पोहोचली. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत केले. रात्री उशिरा सुमारे 700 विद्यार्थी हवाई दल आणि एअर इंडियाच्या विमानाने देशात परतले आहेत. उद्या म्हणजेच 5 मार्चपर्यंत आणखी 15 हजार मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Embed widget