मुंबई-पुणे-मुंबई; 500 किमीहून अधिक रेंज देणारी Kia EV9 electric luxury SUV लवकरच होणार लॉन्च
Kia EV9 Launch: Kia Motors ने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आपली पहिली SUV EV6 सह पदार्पण केलं होत. आता यानंतर कंपनी आणखी एक फुल साइज SUV EV9 वर काम करत आहे.
Kia EV9 Launch: Kia Motors ने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आपली पहिली SUV EV6 सह पदार्पण केलं होत. आता यानंतर कंपनी आणखी एक फुल साइज SUV EV9 वर काम करत आहे. कंपनी पुढील वर्षी ही मोठी इलेक्ट्रिक लक्झरी एसयूव्ही लॉन्च करणार आहे. EV9 इलेक्ट्रिक मॉडेल ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित असेल. ज्यावर कंपनीचे EV6 देखील आधारित आहे. 4WD सिस्टिमसह येणारी EV9 ही खऱ्या अर्थाने SUV असेल.
लूक आणि रेंज
फोटोत असे दिसत आहे की, EV9 ही एक मोठी आणि बॉक्सी दिसणारी SUV असेल. या नवीन कारच्या डिझाइनची कॉन्सेप्ट दर्शविण्यासाठी कंपनीने यापूर्वी एक टीझर जारी केला होता. ज्यामध्ये या कारमध्ये ब्लँक ऑफ ग्रिल आणि स्लिम एलईडी लाईट दिसत आहे. या कारच्या चाकांचीही खास रचना करण्यात आली आहे. या वाहनात 500 किमी किंवा त्याहून अधिक रेंज देण्यासाठी ड्युअल मोटर बॅटरी सेटअप दिला जाईल. EV9 ही प्रीमियम SUV असेल जी EV6 पेक्षा अधिक पॉवरफुल असेल. याच्या आतील भागात 27-इंचाचा मोठा स्क्रीन डिस्प्ले मिळेल. ज्यामध्ये सुरक्षेसाठी ड्रायव्हर असिस्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
कशी असेल EV9
भारतातील यशानंतर Kia EV6 प्रमाणेच कंपनी EV9 ला भारतात आयात करून आणणार आहे. EV6 च्या पहिल्या बॅचची विक्री पूर्ण झाली आहे आणि आता नवीन बॅचसाठीही बुकिंग केले जात आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक कार हळूहळू भारतातील लक्झरी स्पेसमध्ये आपली जागा निर्माण करत आहेत. EV9 मध्ये जबरदस्त लूक आणि मोठी रेंज देण्याचा दावा करतानाच ही कार EV6 नंतर भारतातील कंपनीची पुढील प्रमुख कार असेल, असे सांगण्यात येत आहे. सध्या Kia ने भारतासाठी नवीन इलेक्ट्रिक कारची कॉन्सेप्ट दाखवली आहे. तसेच कंपनीने नवीन अपडेटेड सेल्टोस देखील अनेक बदलांसह सादर केली आहे. नवीन सेल्टोस 2023 पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले जाईल आणि नंतर लॉन्च केले जाईल.
महत्वाच्या बातम्या :