Upcoming Cars: ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित होणार 'या' जबरदस्त कार, पाहा संपूर्ण लिस्ट
Auto Expo 2023: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मंदी सदृश्य वातावरण होते. मात्र यात तेजी पाहायला मिळत आहे.
Auto Expo 2023: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मंदी सदृश्य वातावरण होते. मात्र यात तेजी पाहायला मिळत आहे. यातच वर्ष 2023 च्या सुरुवातीला 13 ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्सपोचे आयोजन केले जाणार आहे. भारतातील हा सर्वात मोठा मोटर शो ग्रेटर नोएडा येथे होणार आहे. वाहनांचे शौकीन असलेले लोक दरवर्षी या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या नवीन कार प्रदर्शित करणार आहे. यातच आपल्याला कोणत्या नवीन कार पाहायला मिळू शकतात, याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Maruti Baleno Cross
भारतातील नवीन ब्रेझा आणि ग्रँड विटारा नंतर, मारुती आता त्याच क्रमाने आपली नवीन बलेनो एसयूव्हीच्या रूपात आणण्याच्या तयारीत आहे. हे नवीन कार चाचणीदरम्यान दिसली आहे. कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये या नवीन कारचे अनावरण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारचे नाव बलेनो क्रॉस असू शकते, सध्या मारुतीने याचे कोडनेम YTB ठेवले आहे.
Kia Carnival Facelift
Kia कार्निवलची नवीन फेसलिफ्ट व्हर्जन ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकते. कंपनी या लक्झरी कारची काही जागतिक बाजारपेठांमध्ये दीर्घ काळापासून विक्री करत आहे. ही कार काही काळापूर्वीच अपडेट करण्यात आली आहे. ही नवीन कार सध्याच्या 2.2 लीटर डिझेल इंजिनसह भारतात येईल.
Five Door Mahindra Thar
महिंद्राची ही पॉवरफुल ऑफ-रोड SUV आहे. चाचणी दरम्यान ही नवीन कार अनेकदा पाहिली गेली आहे. महिंद्र पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये ही नवीन एसयूव्ही प्रदर्शित करेल. सध्या सध्याच्या थारलाही बाजारात खूप मागणी आहे.
Maruti Suzuki Jimny
मारुती सुझुकी आपली बहुप्रतिक्षित फाय-डोअर कार Maruti Suzuki Jimny 2023 ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित करेल. मारुती या कारची टू-डोअर व्हर्जन जागतिक बाजारात आधीच विकत आहे. या कारचे नवीन प्रकार भारतातही विकले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मारुतीची ही आगामी एसयूव्ही महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांच्याशी स्पर्धा करेल.
एमजीची दोन दरवाजांची इलेक्ट्रिक कार
एमजी मोटर इंडिया आपली भागीदार कंपनी वुलिंग्सच्या एअर मॉडेलवर आधारित नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही नवीन कार प्रदर्शित करू शकते. हे मॉडेल काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन कारमध्ये 20kWh ते 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. जे एका चार्जवर 150 किलोमीटरपर्यंत धावण्यास सक्षम असेल.