(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kia Carens Car : 'या' 7 सीटर कारच्या डिलिव्हरीसाठी 17 महिने वाट पाहावी लागणार; जाणून घ्या काय आहे खास
Kia Carens Car : Kia Carens कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT, 6-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राईव्ह मोड मिळतात.
Kia Carens Car : गेल्या काही महिन्यांपासून भारतात अनेक नवीन कार लॉन्च करण्यात आल्या. एकापाठोपाठ सणदेखील आल्याने ग्राहकांची चार चाकी कारसाठी, तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी मागणी वाढत चालली आहे. दिवाळीचा (Diwali 2022) सणसुद्धा अवघ्या काही दिवसांवर आहे. अशातच यापैकी काही कार तर इतक्या लोकप्रिय आहेत की ग्राहकांना त्यांच्या डिलिव्हरीसाठी साधारण 1 ते 2 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे. सध्या, महिंद्राच्या Scorpio-N ला सर्वाधिक प्रतीक्षा कालावधी मिळत आहे. हा प्रतीक्षा कालावधी 21 महिन्यांहून अधिक आहे. त्याच वेळी, देशात आणखी एक 7 सीटर कार आहे ज्यासाठी ग्राहकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही कार आहे Kia Carens. खरंतर, Kia कडून या Carens MPV वर सुमारे 17 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी देखील आहे.
तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध
Kia Carens मध्ये 1.5 L पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 115 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क निर्माण करते, 1.4 लिटर टर्बो पेट्रोल 140 PS पॉवर आणि 242 Nm टॉर्क आणि 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. टॉर्क जनरेट करणार्या 1.5 लिटर डिझेलसारख्या तीन इंजिनांची निवड आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड डीसीटी, 6-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड मिळतात.
Kia Carens चे फिचर्स :
Kia Carense मध्ये 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, सिंगल-पॅन सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक वन-टच फोल्डिंग सेकंड-रो सीट्स, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये आहेत. अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
किंमत किती आहे?
Kia Carens वरील 75-आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी ही MPV किती लोकप्रिय आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. Kia Carrans ही एक अतिशय सुरक्षित कार आहे ज्यामध्ये सर्व प्रकारांमध्ये किमान 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. या कारला पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे, ज्यामुळे या कारला SUV सारखा फील मिळतो. या MPV ची एक्स-शोरूम किंमत ₹ 9.60 लाख ते ₹ 17.70 लाख दरम्यान आहे.