(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल
कुसडगावचे SRPF प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. पण महाविकास आघाडीच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणल्याचे वक्तव्य आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)केलं.
Rohit Pawar: कुसडगावचे SRPF प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. पणमहाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणल्याचे वक्तव्य राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं. यावेळी आमचे विरोधक (राम शिंदे) बिस्कीट खात बसल्याचा टोलाही रोहित पवारांनी लागवला. आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही आणि आमच्याबाबत सुडाचे राजकारण कोणी करत असेल तर त्याला सोडतही नाही असेही रोहिकत पवार म्हणाले.
SRPF प्रशिक्षण केंद्रामुळे जामखेड तालुक्यात साडे सहा हजार पोलिस राहणार आहेत. यापुढं राज्यात कुठेही पोलिसांची मदत लागली तर जामखेड तालुक्याला फोन येईल असंही रोहित पवार म्हणाले. इथं काही बॅनर इथे लागले होते, की प्रशिक्षण यांनी (राम शिंदे) यांनी मंजूर केलं, पण माझ्याकडे सर्व जीआर आहेत. तुम्ही अडीच वर्षे मतदारसंघ फिरकले सुद्धा नाहीत. पुढचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
मी दिल्लीपुढे झुकणार नाही
मी माझ्या मतदारसंघातील लहान बहीण-भावांना चॉकलेट,आणि शालेय साहित्य देतो. मला मन आहे भावना आहे म्हणून मी देतो, पण माझे विरोधक त्यावरूनही टीका करतात. पण तुम्हाला भावना नाही त्याला मी काय करु असेही रोहित पवार म्हणाले. मी कर्जत-जामखेडचा सेवक आहे. कर्जत-जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात असेही ते म्हणाले. SRPF केंद्राबाहेर गेलो तर पोलीस विनंती करत होते हे लोक ऐकणार नाही तुम्हीच त्यांना सांगा. मी ईडी कार्यालयात गेलो तेंव्हा पण कर्जत- जामखेडचे लोक कार्यालयाबाहेर जमा झाले होते. ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला बाहेर आलेले लोक कुठून आलेत. त्यांना वाटलं तासभर हे लोक थांबतील पण लोक थांबले नाहीत. ED वाले देखील म्हणाले "मान गये बॉस" असे रोहित पवार म्हणाले. ही कर्जत-जामखेडच्या लोकांची ताकद आहे, म्हणून मी दिल्लीपुढे झुकणार नाही. त्यांच्यापुढे हाच प्रश्न असतो की याला थांबवायचे कसे असे रोहित पवार म्हणाले.
आम्ही ठरवल असतं तर पोलिसांची गाडी उचलून फेकली असती पण...
काही लोक म्हणतील की मी प्रशिक्षण केंद्रात का गेलो नाही. पण हे पोलीस अधिकारी हे राज्याचे भूमिपुत्र आहेत. आपण आत गेलो असतो तर याच भूमिपुत्र पोलीसांची नोकरी गेली असती, म्हणून मी प्रशिक्षण केंद्रात गेलो नाही. तिथे काही झाले असते तर मी पहिली काठी आणि पहिली गोळी खाल्ली असती असे रोहित पवार म्हणाले. आम्ही ठरवल असतं तर पोलिसांची गाडी उचलून फेकली असती पण पोलिसांकडे पाहून आम्ही थांबल्याचे रोहित पवार म्हणाले. पण येत्या दोन महिन्यांनंतर सरकारच्या अहंकाराचा फुगा स्वाभिमानी जनता फोडेल असेही रोहित पवार म्हणाले.
मविआ सरकार आल्यावर लाडकी बहिणी योजना बंद करणार नाही
महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहिणी योजना बंद करणार नाही, उलट जास्त ताकदीने राबवणार असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. पण सध्या जे लाडकी खुर्ची योजना सुरू आहे ती जनता थांबवणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. मी कर्जत-जामखेड ऐवजी कुठल्याही मतदारसंघात उभा राहिलो असतो.पण लोकसभा निवडणुकीच्या काळात मी कर्जत-जामखेडमध्ये फिरायचो तेव्हा मला असं वाटायचं ही लोकं माझीच आहेत. त्यावेळी पवार साहेबांनी विचारले तेव्हा मी त्यांना सांगितले मी कर्जत-जामखेडमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार. पवार साहेबांनी सांगितले की, तू तिथे आमदार झाल्यावरही तुझ्या स्वभावात बदल होऊ देऊ नकोस, तेच मी करत असल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात मी प्रत्येकाची घरातील व्यक्तीप्रमाणे सेवा केल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या: