एक्स्प्लोर

लूकच नाही तर फीचर्सही आहेत जबरदस्त, नवीन Keeway V302C लॉन्च

Keeway v302c Price In India: हंगेरियन बाईक निर्माता Keeway ने आपली नवीन क्रूझर बाईक Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

Keeway v302c Price In India: हंगेरियन बाईक निर्माता Keeway ने आपली नवीन क्रूझर बाईक Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेसाठी हे ब्रँडचे चौथे उत्पादन आहे. या बाईकची किंमत 3,89,000 ते 4,09,000 (एक्स-शोरूम, भारत) रुपयांदरम्यान आहे. कंपनीने ग्रे, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर केली आहे.

इंजिन आणि पॉवर 

Keeway V320c ही ब्रँडची छोटी V-ट्विन बाईक आहे. जी नुकत्याच लॉन्च झालेल्या Keeway K-Lite 250V पेक्षा ही अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही क्रूझर बाईकला V-ट्विन सेटअप मिळतो. Kiway V320c मध्ये 298 cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, 8-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 8500 rpm वर 29.5 bhp पॉवर आणि 6500 rpm वर 26.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 

या बाईकला स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Kiway V320c तिच्या किंमत आणि फीचर्समुळे भारतातील सर्वात स्वस्त V-ट्विन सिलेंडर बाईक्सच्या यादीत सामील झाली आहे.

Keeway V320c च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकला वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15-लिटर टीयरड्रॉप फ्युएल टँक, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, फ्लॅट हँडलबार, वर्तुळाकार एलईडी टेल लाईट, ब्लॅक मॅट फिनिश एक्झॉस्ट देण्यात आला आहे.

बाईकच्या पुढील बाजूस इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस स्प्रिंग लोडेड ड्युअल शॉक Absorber आहेत. बाईकमध्ये सिंगल रायडरसाठी लहान  सीट आहे. सुरक्षेसाठी बाईकच्या पुढच्या बाजूला 300 mm आणि मागच्या बाजूला 240 mm चा डिस्क ब्रेक आहे. तसेच बाईकच्या मागे आणि पुढे 120/80-16 आणि  150/80-15 सेक्शन टायर देण्यात आले आहेत. ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS ने सुसज्ज आहे. बाईकचे एकूण वजन 167 किलो आहे.

Keeway  V320c ही एक परवडणारी V-ट्विन क्रूझर बाईक आहे. मात्र या किमतीच्या श्रेणीमध्ये, रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 हा ट्वीन-सिलेंडर सेट-अपसह आणखी एक मजबूत दावेदार आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 फक्त जास्त पॉवर जनरेट करत नाही तर ही बाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget