Hero MotoCorp ने भारतीय सैन्याला गिफ्ट केली Destini 125 स्कूटर, याचा डिझाईन आहे खास
Hero MotoCorp: हिरो मोटोकॉर्पने भारतीय सैन्याच्या जवानांना Hero Destini 125 स्कूटर भेट दिली आहे. देशाचे रक्षण करताना शारीरिकदृष्ट्या अपंग झालेल्या लष्करातील जवानांना ही स्कूटर देण्यात आली आहे.
Hero MotoCorp: हिरो मोटोकॉर्पने भारतीय सैन्याच्या जवानांना Hero Destini 125 स्कूटर भेट दिली आहे. देशाचे रक्षण करताना शारीरिकदृष्ट्या अपंग झालेल्या लष्करातील जवानांना ही स्कूटर देण्यात आली आहे. या रेट्रो-फिटेड गिअरलेस स्कूटर दिल्लीत देण्यात आल्या आहेत. या रेट्रो-फिटेड डेस्टिनी 125 स्कूटर खास लष्कराच्या जवानांसाठी बनवण्यात आल्या आहेत.
या स्कूटरच्या मागील चाकाला दोन सहाय्यक चाकांचा सपोर्ट आहे, ज्यामुळे स्कूटरचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होतो. दिल्ली व्यतिरिक्त हिरो मोटोकॉर्पच्या वतीने भारतीय लष्कराचे जवान विशेषत: गुजरात, दिल्ली-एनसीआर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल या राज्यांमध्ये आहेत. ज्यांना या कस्टमाईज्ड स्कूटर दिल्या जातील.
स्पेसिफिकेशन
Hero Destini 125 BS6 ची भारतात विक्री सुरूच आहे. Hero Destini 125 BS6 ला 125cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. जे 7000 Rpm वर 9 Bhp पॉवर आणि 5500 Rpm वर 10.4 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच याच्या डायमेन्शन बद्दल बोलायचे झाले तर Hero Destini 125 BS6 ची लांबी 1809 mm, रुंदी 729 mm, उंची 1154 mm, व्हीलबेस 1245 mm, ग्राउंड क्लीयरन्स 155 mm, वजन 111.5 kg आणि इंधन टाकी 5.6 लीटर आहे.
किंमत आणि स्पर्धा
Destini 125 XTEC ची किंमत 79990 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तर Hero Destini 125 Standard ची किंमत 69900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. बाजारात याची स्पर्धा TVS Jupiter 125, Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 सारख्या स्कूटरशी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maruti XL6 : नवीन इंजिन, प्रीमिअम लूकसह वाचा Maruti XL6 चा संपूर्ण रिव्ह्यू
- Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतात होणार लॉन्च; 'या' दिवसापासून सुरु होईल प्री-बुकिंग
- मारूतीने लाँच केली Maruti XL6; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स