मारूतीने लाँच केली Maruti XL6; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Maruti XL6 launched : मारूतीने आपली नवी कार Maruti XL6 लाँच केली आहे. ही कार एर्टिगाच्या तुलनेत अधिक प्रीमियम कार आहे.
Maruti XL6 launched: भारतीय कार बाजारपेठेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मारुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मारुती-सुझुकीने आपली आणखी एक नवीन कार लाँच केली आहे. कंपनी Maruti XL6 ही नवीन कार लाँच केली असून एर्टिगा या मॉडेलवर आधारीत ही कार आहे. या कारमध्ये मारूतीने आणखी काही प्रीमियम फिचर्सचा समावेश केला आहे. त्याशिवाय 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि पॅडल शिफ्टर्ससह ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय या नव्या कारमध्ये सुरक्षितेवर अधिक भर देण्यात आली आहे. कारची किंमत 11.29 लाखांपासून आहे.
Maruti XL6 या कारचा लूक स्टाइलिश आहे. या कारमध्ये नव्या स्विफ्टप्रमाणे क्रोमबार आहे. फ्रंट बंपरदेखील एसयुव्ही प्रमाणे आहे. Maruti XL6 ही कार एसयूव्ही आणि एमपीव्ही यांचे कॉम्बिनेशन असावे अशी दिसते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कारला 16 इंची आकाराचे ड्युअल टोन Alloy Wheels आहे. रिअर टेल लॅम्प ह्या एलईडी असून त्यांना ग्रे लेन्स आहेत.
इंटिरिअर आणि फिचर्स
Maruti XL6 ची अंतर्गत सजावट (इंटिरिअर) बदलण्यात आली आहे. Maruti XL6 मध्ये 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेंमेन्ट सिस्टिम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा सिस्टिम आहे. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या अॅंगलने बाहेरील गोष्टी पाहता येऊ शकतात. त्याशिवाय इतर 40 कार टेक फिचर्स आहेत.
कारमध्ये फ्रंट सीटसाठी अधिक वायूविजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय कूलिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासह इतरही फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये सहा एअर बॅग देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये फीचर्सह सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक महत्त्व देण्यात आले आहेत.
इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
नव्या Maruti XL6 मध्ये 1.5 लिटर ड्युलजेट पेट्रोल इंजिन आहे. त्याशिवाय, 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. स्टेअरिंग माउंटेड पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे. म्हणजे या कारला अधिक चांगला मायलेज मिळणार आहे. ऑटोमॅटिक कारसाठी 20.27 किमी प्रति लिटर आणि मॅन्यूअल कारसाठी 20.57 किमी प्रति लिटर इतका मायलेज कार देईल असा दावा करण्यात आला आहे. Maruti XL6 ही कार सिंगल पेट्रोल इंजिन आहे.
किंमत
Maruti XL6 ची रेंज ही एर्टिगापेक्षा लहान असली तरी ही अधिक प्रीमियम कार आहे. या कारची किंमत 14.5 लाख रुपये आहे. Maruti XL6 ही कार नवीन एर्टिगा आणि किया कॅरेन्स या कारशी स्पर्धा आहे.