Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतात होणार लॉन्च; 'या' दिवसापासून सुरु होईल प्री-बुकिंग
Kia EV6 Electric Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
Kia EV6 Electric Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या ईव्हीसाठी सर्व तयारी केली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, Kia EV6 च्या अधिकृत लाँचच्या आधी प्री-बुकिंग 26 मे 2022 पासून सुरू होईल. Kia ची देशातील ही पहिली आणि फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार असेल. भारतीय बाजारपेठेत, Kia ची ही इलेक्ट्रिक कार कमी बजेटची असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
फक्त 100 कार विकल्या जातील
इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर सिंगल, फुल-लोडेड व्हेरियंटमध्ये लॉन्च केले जाईल. कंपनीने सांगितले की, लॉन्चच्या पहिल्या वर्षात फक्त 100 युनिट्स विकल्या जातील. Kia सध्या Sonet (Sonet), Seltos (Seltos), Carnival (Carnival) आणि Carens (Carens) यांसारख्या फक्त ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) कार विकते. यापूर्वी कंपनीने आधीच आपली इलेक्ट्रिक कारEV6 जागतिक बाजारपेठेत सादर केली होती.
बॅटरी आणि श्रेणी
टॉप-स्पेक EV6 GT व्हेरियंटला 77.4 kWh चा पॉवरफुल बॅटरी पॅक मिळतो. ही कार कमाल 320 बीएचपी पॉवर आणि 605 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. GT व्हेरियंट ड्युअल इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येतो. कंपनीचा असा दावा आहे की, Kia EV6 एका पूर्ण चार्जवर 425 किमी अंतर कापू शकते. Kia ने असेही आश्वासन दिले आहे की अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने कार फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
प्लॅटफॉर्म आणि मॉडेल
Kia EV6 इलेक्ट्रिक SUV कार निर्मात्याच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (e-GMP) वर आधारित आहे आणि सध्या युरोपियन बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेत, Kia EV6 तीन मॉडेल ऑफर करते. सिंगल मोटर व्हेरिएंट पूर्ण चार्जिंगवर 739km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांची लाइनअप तयार करण्याची योजना आखली आहे. Kia India ने आतापर्यंत Kia EV6 भारतात लॉन्च करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी कंपनी येत्या काही महिन्यांत लॉन्च करू शकते.
किंमत किती असेल ?
युरोपियन देशांमध्ये, Kia EV6 ची किंमत सुमारे 45,000 युरो आहे. Kia EV6 ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
'या' गाड्यांशी होऊ शकते टक्कर
जर ही इलेक्ट्रिक कार बजेट किंमतीत लॉंच करण्यात आली तर ती भारतातील Tata Nexon EV, Tata Tigor EV, MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी टक्कर देऊ शकते. मात्र, तो बाजारात येईपर्यंत अनेक गाड्याही बाजारात येऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :