Car Buying Tips : पहिल्यांदाच कार खरेदी करताय? मग या गोष्टी ठेवा लक्षात
आयुष्यातील पहिली कार ही प्रत्येकासाठीच विशेष असते.मात्र कार खरेदी करताना त्याची किंमत , फिजर्स या सोबतच इतर अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
1. एसयूवी (SUV) गाड्यांची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या गाड्यांमध्ये असणाऱ्या काही अनोख्या आणि नवीन फिचर्समुळे या गाड्यांना ग्राहक मोठी पसंती देताना दिसत आहेत.
2. मारुती देखील ग्राहकाची पहिली पसंती आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक सेवा, वाहनांच्या विक्रीसाठी विस्तृत नेटवर्क आणि वाहनांचे उत्कृष्ट मायलेज.
3. भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच आता भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये सेफ्टीची काळजी घेतली जात आहे. भारतात हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही आणि एसयूव्हीला मोठी मागणी आहे. भारतात हॅचबॅक सेगमेंटमधील वाहनांना नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पसंतीच्या कारचा प्रकार निवडा.
4.होंडा (Honda) आणि टोयोटा (Toyota) वाहनांना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. तर मारुतीची डिझायर आणि मारुती वॅगन आर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ह्युंदाईच्या क्रेटाचाही (Hyundai Creta) या यादीत समावेश आहे.
5. कार खरेदी करताना, तुम्ही कारचा इंधन प्रकार निवडावा. म्हणजेच, तुम्हाला कोणत्या इंधनावर कार चालवायची आहे, पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रिक हे आधीच ठरवा. तुम्ही तुमची कार कुठे आणि किती वापरणार हे इंधनाच्या प्रकारावर अवलंबून असते. इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलायचे तर, बाजारातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार 10 लाख रुपयांच्या आत खरेदी केली जाऊ शकते.जी तुमची पेट्रोलवरील खर्चात बचत करू शकते.
6. तुम्ही बजेटमुळे सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी अल्टो, वॅगन-आर (WagonR) आणि क्विड सारखी वाहने हा एक चांगला पर्याय आहे. पण वापरलेली कार खरेदी करताना, तुम्हाला कारची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे.
7. कार खरेदी करण्यापूर्वी विशिष्ट ब्रँडच्या गाडीचा ऑनलाईन रिव्हिव्ह पहा. गाडीमध्ये असलेल्या कमतरता आणि इतर नकारात्मक बाबी जाणून घ्या. सुरक्षेसंबंधित फीचर्सला प्राधान्य द्या.
8. अनेक लोक शक्यतो कर्जावर कार घेतात. म्हणूनच, जर तुम्ही तुमची कार कर्ज घेऊन खरेदी करत असाल, तर तुम्हाला तुमच्या पगाराचीही काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही वेळेवर ईएमआय भरू शकाल. यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई तुमचे नुकसान करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या