Upcoming Hybrid Cars: मारुती आणि होंडा आणणार दोन नवीन कार, स्ट्राँग हायब्रीड तंत्रज्ञानाने असेल सुसज्ज
Hybrid Cars: गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत हायब्रीड पॉवरट्रेनने सुसज्ज असलेल्या अनेक कारची एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरच मारुती सुझुकी आणि होंडा मोटर्स त्यांची दोन नवीन हायब्रीड कार मॉडेल्स देशात आणणार आहेत.
Hybrid Cars: गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत हायब्रीड पॉवरट्रेनने सुसज्ज असलेल्या अनेक कारची एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये Honda City Hybrid, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyrider यांचा समावेश आहे. त्यामुळे बाजारात या गाड्यांची संख्या वाढली आहे. जरी हे तंत्रज्ञान अद्याप भारतात आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी, डिझेल इंजिन असलेली वाहने बाजारपेठेतून हळूहळू गायब होत असल्याने आगामी काळात त्यात आणखी वाढ दिसून येईल. लवकरच मारुती सुझुकी आणि होंडा मोटर्स त्यांची दोन नवीन हायब्रीड कार मॉडेल्स देशात आणणार आहेत. ज्यामध्ये मारुती एमपीव्ही लॉन्च करणार आहे आणि होंडा एक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. चला जाणून घेऊया कशा असतील या गाड्या.
नवीन Honda मिडसाईज हायब्रिड SUV
Honda ची नवीन मध्यम आकाराची SUV जून 2023 मध्ये जागतिक बाजारपेठेत दाखल होईल. त्यानंतर ती भारतात लॉन्च केली जाईल. हे नवीन मॉडेल सिटी सेडानच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. याच्या भारतातील विशिष्ट मॉडेलमधील बहुतेक डिझाइन एलिमेंट्स त्याच्या जागतिक मॉडेलसारखेच असतील. याची लांबी सुमारे 4.2-4.3 मीटर असू शकते. यात 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर पेट्रोल स्ट्राँग हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय मिळेल. यात डिझेल इंजिन मिळणार नाही. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. यामध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, कनेक्टेड कार टेक, 360 डिग्री कॅमेरा आणि अनेक एअरबॅग्ज ही फीचर्स पाहायला मिळतील. याची संभाव्य किंमत 12 लाख ते 19 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
मारुती हायब्रीड MPV
मारुती सुझुकी या वर्षाच्या अखेरीस देशात प्रीमियम एमपीव्ही लॉन्च करणार आहे. ही कार ऑगस्ट 2023 पर्यंत देशात येऊ शकते. ही MPV टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची रिबॅज केलेली आवृत्ती असेल. यात 2.0-लीटर पेट्रोल स्ट्राँग हायब्रिड आणि 2.0-लिटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल. जे अनुक्रमे 186 PS आणि 206 Nm आणि 174 PS आणि 205 Nm चे आउटपुट जनरेट करेल. म्हणजेच नवीन मारुती एमपीव्हीला इनोव्हा हायक्रॉस सारखीच पॉवरट्रेन मिळेल. ADAS तंत्रज्ञानासह येणारी ही कंपनीची पहिली कार असेल. हे बर्याच अंशी इनोव्हा हायक्रॉससारखे असेल, परंतु यात काही कॉस्मेटिक बदल दिसेल.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Audi Upcoming Cars: ऑडी 2025 पर्यंत 20 नवीन मॉडेल सादर करणार, 10 इलेक्ट्रिक कारचाही समावेश