Wagon R Car : 34.37 किमीच्या मायलेजसह नवीन WagonR भारतात लॉन्च, दमदार फीचर्ससह जाणून घ्या किंमत
Wagon R Car : वॅगन आरच्या LXI व्हर्जनमधील बेस हॅचबॅक सुपीरियर व्हाईट आणि सिल्की सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Wagon R Car : मारुती सुझुकीची वॅगन आर कार (Wagon R Car) ही केवळ खाजगी खरेदीदारांसाठीच नाही तर फ्लीट ऑपरेटर्ससाठी देखील लोकप्रिय मॉडेल आहे. हे लक्षात घेऊन, ब्रँडने आता फ्लीट मार्केटसाठी वॅगन आर टूर H3 हे नवीन मॉडेल सादर केले आहे. वॅगन आर टूर H3 DZire आणि Ertiga च्या टूर व्हर्जनमध्ये सामील होते आणि तिन्ही मॉडेल्स मारुती सुझुकी अरेना तसेच त्याच्या व्यावसायिक डीलरशिपद्वारे विकल्या जातात.
वॅगन आरच्या LXI व्हर्जनमधील बेस हॅचबॅक सुपीरियर व्हाईट आणि सिल्की सिल्व्हर कलर ऑप्समध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये EBD, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि फ्रंट पॉवर विंडोसह ABS फीचर्स आहेत. मारुती CNG आवृत्तीसह 34.37 किमी/किलो मायलेजचा दावा करत आहे. दोन्ही प्रकार मानक 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्याला पॉवर देण्यासाठी वॅगन आर टूर एच3 मध्ये 1.0 लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्याचे इंजिन 64hp पॉवर आणि 89 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. याला स्टार्ट-स्टॉप सिस्टमसह मारुतीचे ड्युअलजेट टेक्नॉलॉजी देखील मिळते. ज्यामुळे 25.4 किमी/ली मायलेजचा दावा केला जातो. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.39 लाख रुपये आहे.
फेब्रुवारीमध्ये, मारुती सुझुकीने 2022 मॉडेल वर्षासाठी अपडेटेड वॅगन आर सादर केली. मॉडेलला आता अधिक कार्यक्षम 1.0-लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोल युनिट्स, अधिक फीचर्स, आणि प्रकारांमध्ये बदल मिळतो. ह्युंदाई सँट्रो आणि डॅटसन गो यांसारख्या हॅचबॅकशी ती स्पर्धा करते.
महत्वाच्या बातम्या :
- MG ZS EV : इलेक्ट्रिक कार MG ZS EV चे नवीन व्हर्जन नेमके कसे आहे? वाचा संपूर्ण रिव्ह्यू
- Electric Cars : 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
- कशी आहे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक? इंडियात होणार का लॉन्च, जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha