Car Comparison: Citroen C3 Aircross, Hyundai Creta की Maruti Ertiga? तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? वाचा A to Z माहिती
Car Comparison: जर तुम्ही उत्तम आणि आरामदायी कारच्या शोधात असाल, तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या Citroen C3 Aircross, Hyundai Creta आणि Maruti Ertiga या तीन उत्तम पर्यायांचा विचार करु शकता.
Citroen C3 Aircross vs Hyundai Creta vs Maruti Ertiga: सिट्रोन (Citroen) कंपनीने अलीकडेच C3 Aircross ही कार भारतात लॉन्च केली. सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross) मध्ये तीन पंक्तीची आसनव्यस्था (Three Row Sitting) असल्याने ती SUV च्या स्पर्धेत उतरली आहे. आगामी Citroen C3 Aircross ही Hyundai Creta आणि Maruti Ertiga ला टक्कर देईल. पण, यामध्ये नेमकी कोणती कार खरेदी करावी याबाबत जर तुमचा गोंधळ होत असेल, तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross) कारची तुलना इतर कारबरोबर करणार आहोत. कदाचित यामधून तुम्हाला चांगली कार निवडण्याचा पर्याय मिळू शकेल.
डायमेंशन
सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross) ची लांबी 4,300 मिमी आहे.
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) ची लांबी देखील 4,300 मिमी आहे.
मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) मात्र लांबीने थोडी जास्त आहे, तिची लांबी 4,395 मिमी आहे.
रुंदीचा विचार केला तर, सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross)ची रुंदी जास्त आहे. ती 1,796 मिमी रुंद आहे.
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) 1,790 मिमी रुंद आहे.
मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) 1,735 मिमी रुंद आहे.
व्हीलबेस हा एक महत्त्वाचा भाग असून, सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross)चा व्हीलबेस 2,671 मिमी आहे.
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)चा व्हीलबेस 2,610 मिमी आहे.
मारुती एर्टिगा (Maruti Ertiga)चा व्हीलबेस 2,740 मिमी आहे.
फिचर्स
सिट्रोन C3 एअरक्रॉसला वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10 इंच टचस्क्रीन मिळते, तर ह्युंदाईच्या क्रेटाला 10.25 इंच टचस्क्रीन मिळते आणि एर्टिगामध्ये 7 इंचाची छोटी स्क्रीन आहे.
C3 एअरक्रॉस आणि एर्टिगा दोघांनाही सर्व पंक्तींसाठी एकहून अधिक व्हेंट्स (Vents) मिळतात तर क्रेटा 5-सीटर असल्याने तिला मागील एसी व्हेंट्स मिळतात.
वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, क्रेटामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, हवेशीर जागा आणि बरेच काही आहे.
C3 एअरक्रॉसमध्ये क्लायमेट कंट्रोल किंवा सनरूफ किंवा वायरलेस चार्जिंगसह जवळपास सर्वच वैशिष्ट्ये अपुरी पडतात.
मारुतीच्या एर्टिगा कारमध्ये सनरुफ नाही. मात्र, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प, रिअर कॅमेरा, कप होल्डर, आणि बरेच काही मिळते.
इंजिन कसं आहे?
Citroen C3 Aircross कारमध्ये, कंपनी 1.2 L टर्बो पेट्रोल इंजिन देते, जे जास्तीत जास्त 110 bhp पॉवर जनरेट करते.
Hyundai Creta कार 1.5 L पेट्रोल आणि 1.4 L टर्बो पेट्रोल युनिटसह डिझेलसोबत मिळते.
Maruti Ertiga कारमध्ये, कंपनी 1.5 L पेट्रोल इंजिन देते.
सिट्रोन C3 एअरक्रॉस वगळता क्रेटासह एर्टिगा देखील स्वयंचलित (Automatic) पर्याय प्रदान करतात. क्रेटा CVT आणि DCT गियर बॉक्ससह सर्वाधिक टॉर्क जनरेट करते.
या सर्वातून हे स्पष्ट आहे की, सिट्रोन C3 एअरक्रॉस (Citroen C3 Aircross) फिचर्स आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत क्रेटाशी स्पर्धा करत नाही. पण ती 7 सीटर एर्टिगाशी स्पर्धेत आहे. एर्टिगा कारमध्ये सिट्रोन C3 एअरक्रॉस कारहून मोकळी जागा जास्त मिळते. मात्र, ज्यांना कमी किमतीत SUV कार घ्यावीशी वाटते, त्यांच्यासाठी सिट्रोनची C3 Aircross ही उत्तम कार आहे.
संबंधित बातम्या:
Maruti Suzuki: या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार मारुतीची खास कार! थारसारखाच आहे लूक; पाहा...