एक्स्प्लोर

Honda Elevate Launched : 'या' अनोख्या वैशिष्ट्यांसह होंडा एलिवेट भारतात लॉन्च, जाणून घ्या कारचे नवीन स्टायलिंग फीचर्स

Honda Elevate Launched : भारतीय बाजापेठेत सध्या SUV ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या SUV बाजारात लॉन्च करत आहेत. अशातच आज Honda Elevate SUV भारतात लॉन्च झाली आहे.

Honda Elevate SUV Launched : नव्या आणि हटके फीचर्ससह होंडा एलिव्हेट अखेर आज भारतात लॉन्च झाली आहे. या कारच्या अनोख्या वैशिष्ट्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. होंडा कार्स इंडियाच्या SUV गाड्यांच्या विभागामध्ये आता या नव्या कारचा समावेश झाला आहे. आज SUV ची होंडा एलिव्हेट प्रथमच संपूर्ण जगासमोर सादर करण्यात आली. याआधी होंडाच्या आठ कार लॉन्च झाल्या होत्या. त्यात Citroen C3 Aircross ही देखील नुकतीच लॉन्च झालेली होती. मात्र होंडा एलिव्हेटने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी कारचे स्पाय फोटो ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात एसयूव्हीमध्ये (SUV) मिळणाऱ्या फीचर्सचा अंदाज सहजपणे लक्षात येत होता. तसेच या होंडा एलिव्हेटमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे ड्रायव्हरला वेगवेगळ्या दिशेतील दृश्यं पाहता येणार आहेत. 

काय आहेत होंडा एलिव्हेट SUV चे फीचर्स? ( What Are The Honda Elevate Features?)

Honda Elevate SUV परदेशात विकल्या जाणार्‍या HR-V आणि CR-V मॉडेल्स सारखी दिसणार आहे. यात बुच अपील असेल आणि त्याची लांबी सुमारे 4.2-4.3 मीटर असेल. एलिव्हेटमध्ये लेव्हल-2 ADAS (एडवांस्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), कनेक्टेड कार कार्यक्षमतेसह 10.25 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरुफ इ. मिळेल. सोबत एलईडी लाईट्स असतील. चाकांच्या वरील डिझाईन चौकोनी असणार आहे. 

Honda Elevate SUV इंजिन आणि गिअरबाॅक्स कसे असेल ? (How The Honda Elevate SUV Engine And Gearbox Looks Like)

ही कार 1.5L पेट्रोल इंजिनसह ऑफर केली आहे. ट्रान्समिशनसाठी, ती 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक CVT पर्याय आणि पॅडल शिफ्टर्सशी जोडलेली आहे. एलिव्हेटमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह 1.5-लिटर अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल स्ट्राँग हायब्रीड युनिट असण्याची शक्यता आहे आणि ती ई-सीव्हीटीशी जोडली जाईल.

Honda Elevate SUV किंमत (Price Of Honda Elevate SUV)

नवीन Honda Elevate SUV आज लॉन्च झाली असून यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या मिड साईजच्या एसयूव्हीची किंमत 11 लाख ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. Honda Elevate ची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Suzuki Grand Vitara यांच्याशी होऊ शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या

World Environment Day: महागड्या इलेक्ट्रिक कारसाठी देशातील पायाभूत सुविधांची स्थिती कशी? ई-ट्रॉन खरेदीचा निर्णय कितपत योग्य? पाहा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget