New Everest/Endeavour: फोर्ड इंपोर्टेड नवीन एव्हरेस्ट-एन्डेव्हर येतेय, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
New Everest/Endeavour: फोर्डने (Ford) जागतिक बाजारात आपली नवीन एव्हरेस्ट-एन्डेव्हर कार लॉन्च केली आहे. नवीन एन्डेव्हर रेंजर पिकअपवर आधारित आहे.
New Everest/Endeavour: अमेरिकेची वाहन उत्पादक कंपनी फोर्डने जरी भारतातून आपला गाशा गुंडाळला असला तरी भारतात अजूनही अनेक असे अनेक लोक आहेत, ज्यांना फोर्डच्या गाड्या पसंत आहेत. अशातच आता फोर्ड जागतिक बाजारात आपली नवीन एव्हरेस्ट-एन्डेव्हर कार लॉन्च करणार आहे. नवीन एन्डेव्हर रेंजर पिकअपवर आधारित आहे. नवीन एन्डेव्हर आधीच्या मॉडलपेक्षा अधिक मोठी आणि रुंद आहे. डिझाइनच्या बाबतीत ही कार पूर्णपणे नवीन आहे. यात नवीन मेट्रीस एलईडी सी-आकाराचे हेडलॅम्प आणि नवीन ग्रील देण्यात आली आहे.
नवीन एव्हरेस्ट/एंडेव्हरचा लूक दिसायला अॅग्रेसिव्ह आहे. तर याच्या मागील भाग काही प्रमाणात जुन्या एन्डेव्हरसारखा आहे. मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टॉप-एंड व्हेरियंटवर पोर्ट्रेट स्टाईल आणि 12-इंच टच स्क्रीनसह आतील भाग देखील नवीन आहे. या गाडीत ग्राहकांना ऐसपैस जागा मिळेल.
इंजिन आणि फीचर्स
यात 10-वे पॉवर अॅडजस्टमेंट, पॅनोरामिक सनरूफ, नवीन SYNC 4A सिस्टम, कनेक्टेड कार टेक, 360-डिग्री कॅमेरा, नवीन ड्रायव्हर असिस्ट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच यात प्रीमियम लेदर अॅक्सेंटेड फ्रंट सीट्स देखील ग्राहकांना मिळणार आहे. नवीन एन्डेव्हरमध्ये ग्राहकांना 3.0-लीटर V6 टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे. यात 2.0-लीटर बाय-टर्बो डिझेल 10-स्पीड ऑटोमॅटिकशी जोडलेले आहे.
यात 4x2 आणि 4x4 असे दोन मॉडेल्स आहेत. यात 4x4 कायमस्वरूपी फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आले आहे. जे ड्राइव्ह मोडसह इलेक्ट्रॉनिकरित्या नियंत्रित ऑन-डिमांड टू-स्पीड इलेक्ट्रोमेकॅनिकल ट्रान्सफर केसचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच या कारची 800 मिमी पर्यंत वॉटर वेडिंग क्षमता आहे. CBU मॉडेल म्हणून नवीन Endeavour अधिक महाग असेल. मात्र नवीन लूक आणि फीचर्समुळे बाजारात याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
हे देखील वाचा-
- Cheapest SUV In India : मोठ्या कुटुंबासाठी भारदस्त कार, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर SUV
- E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
- KIA Motors लवकरच भारतात Kia EV6 लॉन्च करणार, कारप्रेमींनो जाणून घ्या
- Cheapest Sedan Cars : या आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, जाणून घ्या किमतीपासून फिचर्सपर्यंत