Cheapest SUV In India : मोठ्या कुटुंबासाठी भारदस्त कार, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर SUV
Cheapest SUV In India : तुमचं कुटुंब मोठं आहे आणि अशातच जर तुम्ही 7 सीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतात सध्या असलेल्या स्वस्त 7 सीटर कारची माहिती देणार आहोत.
मुंबई : मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार फारच सोयीच्या असतात. सोबतच सगळ्यांना कारमध्ये कशी जागा होईल याचं टेंशनही राहत नाही. अशातच जर तुम्ही 7 सीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतात सध्या असलेल्या स्वस्त 7 सीटर कारची माहिती देणार आहोत. या कारचा लूक स्पोर्टी तर आहेच शिवाय मोठ्या कुटुंबाचा विचार करता त्या तुमच्या बजेटमध्येही बसणाऱ्या आहेत. यामध्ये महिंद्रा बोलेरो, महिंद्रा बोलेरो निओ, रेनो ट्रायबर आणि मारुती सुझुकी अर्टिगा यांचा समावेश आहे.
महिंद्रा बोलरो निओ
महिंद्रा बोलरो निओची किंमत सुमारे 8.8 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. हा कार केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. ही कार चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1493cc इंजिन आहे. ही डिझेल कार असून एक लिटर डिझेलमध्ये ती 17 किलोमीटरपर्यंत धावते. ही महिंद्राची 7 सीटर कार आहे.
महिंद्रा बोलरो
महिंद्रा बोलरोची सुरुवातीची किंमतही सुमारे 8.8 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ABS ही मिळतं. कारमध्ये BS6, 1.5 लिटर, 3 सिलेंडर, mHawk75 डिझेल इंजिन आहे. हे इंजिन कमाल 75hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ही 7 सीटर SUV कार आहे. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. कार B4, B6 आणि B6 Opt या तीन व्हेरिएंटमध्ये मिळते.
रेनो ट्रायबर
रेनो ट्रायबरची सुरुवातीची किंमत 5.53 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Renault Triber मध्ये 999cc पेट्रोल इंजिन असून जे 50kW (68Ps) @ 5000 rpm पॉवर आणि 104nm @ 4000 rpm पीक टॉर्क जनरेट करतं. ही देखील 7 सीटर कार आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशनसह येतं.
मारुती सुझुकी अर्टिगा
मारुती सुझुकी अर्टिगा ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते. याची सुरुवातीची किंमत 7.96 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार 17 ते 26 किलोमीटर प्रति किलोपर्यंतचं मायलेज देते. ही कार 7 सीटर आहे. यात 1462 cc, K15B SMART HYBRID BS6 इंजिन आहे.