E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
Shoonya Ka Safar : नीती आयोगाने 'शून्य' मोहिमेच्या शुभारंभासह स्वच्छ गतिशीलतेसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे.
![E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे? shoonya Campaign on niti aayog for ev electric vehicle to make planet eco friendly E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/26/6b4d7ac009829f5d60dca3ebbc5d33c2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shoonya Ka Safar : वाढते प्रदूषण पाहता सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. सरकारने नागरिकांना ईव्हीचे महत्त्व पटवून देण्यासाठी नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. नीती आयोगाने 'शून्य' मोहिमेच्या शुभारंभासह स्वच्छ गतिशीलतेसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. देशातील शून्य-प्रदूषण गतीशीलतेला चालना देण्यासाठी ई-कॉमर्स, राइड-हेलिंग, लॉजिस्टिक आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टममधील 70 कॉर्पोरेट भागीदारांनी नीती आयोगाशी हातमिळवणी केली आहे. रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट (RMI) आणि RMI India यांनी 'शून्य' उपक्रमासाठी हातमिळवणी केली आहे. कॉर्पोरेट ब्रँडिंग कार्यक्रम आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) जागरूकता मोहिमेद्वारे डिलिव्हरी आणि राइडसाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
Receiving a #Shoonya delivery or taking a #Shoonya ride makes a difference. Individual actions can scale to real change. If #electricvehicles completed all deliveries and rides in #India, significant emission reductions and fuel savings would incur each day. pic.twitter.com/K3ROdpE81p
— Shoonya (@Shoonya_India) February 18, 2022
जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून, 25 जानेवारी, 2022 रोजी EVs पासून हवेची गुणवत्ता, पर्यावरण आणि खर्चाचे फायदे याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी शून्य उपक्रमाची जाहिरात मोहीम सुरू केली आहे.
यामध्ये ग्राहक जागरूकता मोहिमेव्यतिरिक्त कॉर्पोरेट ब्रँडिंग प्रोग्रामदेखील समाविष्ट आहे. ब्रँडिंग प्रोग्राममध्ये आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या, राइड-हेलिंग कंपन्या, वाहन उत्पादक, फ्लीट एग्रीगेटर आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रदाते यांच्यासह 72 कॉर्पोरेट भागीदार आहेत. रिसोर्स टूलकिट शून्यच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल, EV वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या EV च्या प्रभावाविषयी मार्गदर्शन करेल आणि त्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Cheapest Sedan Cars : या आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, जाणून घ्या किमतीपासून फिचर्सपर्यंत
- New Lexus ES300h Facelift : हर्षद मेहतालाही घातली होती भुरळ, 'लेक्सस'च्या लेटेस्ट मॉडेलमध्ये जाणून घ्या काय आहे खास...
- New Baleno 2022 : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लॉन्च होणार मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)