Anand Mahindra Scorpio N : 'स्कॉर्पियो एन'मधील N म्हणजे काय? आनंद महिंद्रांना युझरचा प्रश्न, सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा
'स्कॉर्पियो एन (Scorpio N) या नावामधील एनचा आर्थ काय?' अशी कमेंट त्या युझरनं केली.
Anand Mahindra Scorpio N : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असतात. ते ट्विटरच्या माध्यमामधून लोकांसोबत संवाद साधतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी नव्या स्कॉर्पियो कारचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये या गाडीच्या नावामध्ये एन हे अक्षय दिसत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'The Beast. About to be uncaged… ' याचा अर्थ लवकरच बीस्ट पिंजऱ्याबाहेर येणार आहे. त्यांच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. या ट्वीटला आदित्य नावाच्या एका युझरनं कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी या गाडीच्या मॉडेलचे कौतुक केले. मनोज नावाच्या युझरनं ट्वीटला या कमेंट करुन एक प्रश्न विचारला आहे.
आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला मनोजनं कमेंट केली, 'स्कॉर्पियो एन या नावामधील एनचा आर्थ काय?' या ट्वीटला रिप्लाय करत फिरोज अहमद नाम उत्तर दिलं, 'Nचा अर्थ New किंवा Neo असा असू शकतो.' फिरोज अहमदनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. स्कॉर्पियो-एनमध्ये अनेक ड्रायविंग मोड आहेत. तसेच या गाडीमध्ये काही विशेष फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडीमध्ये SUV 360-डिग्री कॅमरा देखील असणार आहे.
'स्कॉर्पियो एन' मधील फिचर्स
नव्या स्कॉर्पिओला पॉवर देण्यासाठी त्यात 2.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येईल. तसेच 2.2 लीटर एमहॉक इंजिन देखील यामध्ये मिळू शकते जे, 3,750rpm वर 130bhpची पॉवर आणि 1,600 ते 2,800rpm मध्ये 300Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स पर्यायांसह लॉन्च केले जाईल. सेफ्टीच्या दृष्टीने पाहिल्यास, नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ 2022 सध्याच्या मॉडेलपेक्षा चांगली असेल. यात 6/7 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम येण्याची शक्यता आहे. Scorpio ला XUV700 प्रमाणेच ADAS सूट मिळण्याची शक्यता आहे. ही गाडी लाँच होण्याची वाट अनेक ग्राहक पाहात आहेत.
महत्वाच्या बातम्या :