एक्स्प्लोर

NEET Exam : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले, अकोल्यातील मुलीने नदीत उडी घेऊन संपवलं आयुष्य

Akola News Update : अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत विद्यार्थीनीने जीवन संपवलं आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे या विद्यार्थीनीने टोकांचं पाऊल उचललं आहे.

अकोला : नीट परीक्षेत (NEET Exam) अपेक्षाप्रमाणे गुण न पडल्याने विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. रोहिणी विलास देशमुख (वय, 22) असं आत्महत्या केल्या तरुणीचे नाव आहे. अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत या तरूणीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लाखो उमेदवार परीक्षेला बसतात. राज्यात नीट परिक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. रोहिणी हिणे दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षाप्रमाणे गुण न पडल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला.

अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत रोहिणी हिने जीवन संपवलं आहे. यापूर्वी रोहिणीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत 350 च्या जवळपास गुण मिळाले होते. यावर्षी दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला 420 गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला 565 च्यावर गुणांची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाप्रमाणे तिला कमी गूण मिळाल्याने रोहिणी तणावात होती. काल रात्री नेहमीप्रमाणे रोहीणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. आज गुरुवारी पहाटे पाज वाजता झोपेतून उठून ती खोलीबाहेर पडली नाही. या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
 
डॉक्टर बनायचं स्वप्नं राहिलं अधुरं 

रोहिणीचे वडील राजस्थानमध्ये राहतात. आकोल्यात ती तिच्या मामाकडं राहायची. वडिलांसह कुटुंबाचं रोहिणीने डॉक्टर व्हावं असं स्वप्न होतं. मात्र आपण कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षित यश आलं नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करत बेटी बचाव या उपक्रमांतर्गत तिला अनेक काम करायचेही स्वप्न होते. परंतु, त्याआधीच तिनं आपलं जीवन संपवलं. 

दरम्यान, दरवर्षी अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. नीटच्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. रोहिणी देखील याची तयारी करीत होती. परंतु, गूण कमी पडल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. 

महत्वाच्या बातम्या

Wardha News : धक्कादायक! बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव  

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?
पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्परही उडालं, आज कसं असेल हवामान?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget