एक्स्प्लोर

Wardha News : धक्कादायक! बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव 

Wardha News Update : बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे.

वर्धा :  बोकड चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे. सुरेश देवराव आत्राम (वय 42 रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अविनाश वसंतराव वासकर ( वय 35 रा, खापरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

संशयित आरोपी अविनाश याने सुरेश याला आपल्या गाडीवर बसवत शेतात नेऊन बोकड चोरल्याच्या करणातून त्याच्याशी भांडण काढले. यातून दोघांमध्यी वाद वाढला. त्यातूनच अविनाश याने सुरेश याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. यात सुरेश गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरंनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर गुरुवारी सकाळी गावातूनच ताब्यात अविनाश याला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हा बुधवारी वर्ध्याहून परत आल्यानंतर दुपारी तीन वाजता तो खापरी येथे पानटरीवर बसला होता. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने त्याला तेथून गाडीवर बसून आपल्या शेतात नेले. तेथे त्याला  काठीने जबर मारहाण करण्यात आली. तेथून सुरेशने पळ काढला. परंतु, जबर मारहाण झाल्याने  तो तेथेच जमिनीवर कोसळला. पुन्हा त्या ठिकाणीही अविनाश याच्याकडून मारहाण करण्यात आली. सुरेश रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर रिंग जात होती, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता.
 
आरोपीनेच फोन उचलून दिली माहिती 
फोन वाजत असल्याने आरोपी अविनाश वासकर यानेच सुरेशचा फोन उचलला आणि सुरेश हा रोडवर पडून असल्याचे कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे गावातील काही तरुण रात्री साडेनऊच्या दरम्यान  घटनास्थळी गेले असता सुरेश हा खापरी येथील गायमुख रोडवर नाल्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळले. त्याच्या हातापायावर तसेच पाठीवर मारहाणीच्या जखमा होत्या. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन बोकड गेले होते चोरीला  
सुरेश आणि अविनाश हे दोघेही चांगले मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी ये-जा होते. अविनाश याचे काही दिवसांपूर्वी दोन बोकड चोरीला गेले होते. या संशयातूनच आरोपीने सुरेशला खापरी येथील आपल्या शेतात नेत त्याला मारहाण करून नाल्याजवळ गायमुख रस्त्यावर आणून टाकले. हत्या केल्याची तक्रार सुरेशच्या आईने पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. सेलू पोलिसांनी रात्रभर खापरी तसेच जंगल परिसरात आरोपीचा शोध घेतला. अखेर आज सकाळी सात वाजता तो गावातच सापडला, त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे पुढील तपास करीत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget