एक्स्प्लोर

अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे

Akola News : अकोला महापालिकेत महापौर-उपमहापौर पदानंतर भाजपने स्थायी समिती आणि इतर समित्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.‌

Akola News : अकोला महापालिकेत ( Akola Municipal Corporation)  महापौर-उपमहापौर पदानंतर भाजपने (BJP)  स्थायी समिती आणि इतर समित्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.‌ आज झालेल्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल विजयी झाले आहेत.‌ त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलु पैलवान यांचा 9 विरुद्ध 6 मतांनी पराभव केला आहे.‌ 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजप आणि मित्र पक्षांचे 9 सदस्य आहेत. तर विरोधी पक्षांचे 7 सदस्य आहेत.‌ आजच्या निवडणुकीत एमआयएमचा एक सदस्य तटस्थ राहिला आहे.

अकोला महापालिकेवर भाजपाच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले

याशिवाय महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या आरती घोगलिया यांची अविरोध निवड झाली आहे. तर चार झोन समित्यांच्या सभापती पदांपैकी दोन वर भाजप, एकवर मित्रपक्ष असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी तर एका झोन समितीवर काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पूर्व दोनच्या सभापती पदी भाजपच्या रश्मी अवचार, पश्चिम झोन सभापतीपदी भाजपचे राजेश्वर धोटे, उत्तर झोन सभापतीपदी काँग्रेसच्या जैनब्बी शेख इब्राहिम तर दक्षिण झोनच्या सभापतीपदी महापालिकेत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूजा गावंडे यांची निवड झाली आहे.‌ या सर्व निवडींनी अकोला महापालिकेवर भाजपाच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील या आघाडीत भाजपसह दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे यांची शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.  

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या साथीने 38 नगरसेवकांसह काठावरचे बहुमत असलेल्या भाजपने विजय मिळवला आहे. खेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेखा काळे यांचा पराभव केला आहे. अकोला महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना सत्तेसाठी केवळ 3 जागांची गरज होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने 41 चा आकडा पार केला. पण यात भाजपला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली. त्यानंतर भाजपने 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत बहुमताचा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत भाजपने 38, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, वंचित बहुजन आघाडी 5, एमआयएम 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1,आणि अपक्ष 3 अशा जागा जिंकल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Droupadi Murmu : ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका
ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही कठोर शब्दात टीका
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
Embed widget