Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन? आकडा वाचून थक्क व्हाल
Bholaa : अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Ajay Devgn Bholaa Fees : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'भोला' (Bholaa) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तब्बू (Tabu) मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
'भोला' साठी अजयने किती मानधन घेतलं? (Ajay Devgn Fess)
'भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या अजय या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत असून या सिनेमासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून या सिनेमासाठी तिने चार कोटी मानधन घेतलं आहे. तसेच संजय मिश्राने या सिनेमासाठी 85 लाख आकारले आहेत. अभिषेक बच्चनची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्याने एक कोटी मानधन घेतलं आहे.
View this post on Instagram
'भोला'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात (Bholaa Advance Ticket Booking)
अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा येत्या 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील अजयचा अॅक्शन मोड पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून अवघ्या काही तासांत 1200 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 7.05 लाखांची कमाई केली आहे.
तामिळ सिनेमाचा रिमेक 'भोला'
'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगणने सांभाळली आहे. हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 'कैथी' या सिनेमाचं दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं. भारतात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. त्यामुळे आता 'भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तब्बूसह संजय मिश्रा, गजराव राव, मकरंद देशपांडे, किरण कुमार आणि दीपक डोबरियाल महत्त्वाच्या भूमिकेत झालेत.
'भोला'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'दृश्मय 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 6.0 कोटींची कमाई केली होती. शाहरुखच्या 'पठाण'नंतर आता बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'भोला'चा बोलबाला पाहायला मिळू शकतो.
संबंधित बातम्या