एक्स्प्लोर

Bholaa Trailer : 'भोला'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सिंघम, दृष्यमनंतर पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये झळकणार अजय देवगण

Ajay Devgn : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी 'भोला' (Bholaa) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Ajay Devgn Bholaa Trailer Released : बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत सुपरस्टार अजय देवगणची (Ajay Devgn) गणना होते. अजयचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 

'भोला'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Bholaa Trailer Released)

'भोला'च्या ट्रेलरमध्ये अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. वाईट गोष्टींचा नाश करत शत्रूंना धडा शिकवताना अजय दिसत आहे. अॅक्शनचा तडका आणि रोमांचक असलेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. अॅक्शन, नाट्य, थरार, क्लायमॅक्स आणि भन्नाट स्टोरी असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'भोला' कधी रिलीज होणार? (Bholaa Release Date)

'दृश्यम 2'च्या यशानंतर अजयचे (Ajay Devgn) चाहते 'भोला' (Bholaa) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण आणि तब्बूची (Tabu) मुख्य भूमिका असलेला 'भोला' हा सिनेमा हा सिनेमा येत्या 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत अजयने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. हा सिनेमा 3D आणि आयमॅक्समध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा 'कैथी' या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अजय आणि तब्बूसह या सिनेमात दीपक डोबरियाल आणि शरद केळकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपक डोबरियाल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि तब्बूच्या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. यआआधी 'दे दे प्यार दे' या सिनेमात त्यांनी स्क्रिन शेअर केली होती. 

अजय देवगणने 'भोला'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"तुम्ही धाडसी असाल तर तुम्ही लढता आणि जिंकता. लढाई जिंकण्यासाठी संख्या, बळ आणि शास्त्राची आवश्यकता नसते". अजय पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हर हर महादेव, भोला ब्लॉकबस्टर होणार, अशा सकारात्मक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Bholaa Movie Teaser: 'एक चट्टान और सौ शैतान...'; अंगावर शहारे आणणारा अजयच्या 'भोला' चा टीझर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget