एक्स्प्लोर

Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार

Air India Pee: एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. 

Air India Pee नवी दिल्ली: एअर इंडियाच्या (Air India) विमानात पुन्हा एकदा सहप्रवाशावर लघुशंका (Air India Pee) करण्याचा विकृत प्रकार समोर आला आहे. दिल्ली ते बँकॉक विमानात भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आली. सदर प्रकरणानंतर एअर इंडियाच्या केबिन क्रू सदस्यांनी आरोपी प्रवाशाला इशारा देऊन सोडण्यात आलं. एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं?

एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 2336 दिल्लीहून बँकॉकला निघालं होतं. यावेळी बिझनेस क्लासमध्ये एका पुरुष प्रवाशाने एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यावर लघुशंका केली. लघुशंका करणारी व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आले. ही घटना विमान बँकॉकमध्ये उतरण्यापूर्वी घडली. लघवी करणारी व्यक्ती बिझनेस क्लासमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सीटवर होती. ज्या व्यक्तीवर त्याने लघवी केली तो देखील बिझनेस क्लासमध्ये होता. सदर घडलेल्या प्रकरणानंतर क्रू मेंबर्सनी पीडित प्रवाशाला तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र पीडित व्यक्तीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही एअर इंडियाच्या विमानात लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.

नागरी विमान वाहतूक मंत्री काय म्हणाले?

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, मंत्रालय या घटनेची दखल घेईल आणि विमान कंपनीशी बोलेल.

लघुशंका केल्याचा प्रकार याआधीही आला होता समोर-

नोव्हेंबर 2022 मध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले. त्यावेळी एअर इंडियाच्या न्यू यॉर्क-दिल्ली विमानात शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने एका महिला प्रवाशावर लघवी केली होती. या घटनेनंतर, आरोपी शंकर मिश्रा याला 6 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आणि नंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. तथापि, नंतर न्यायालयाने 31 जानेवारी 2023 रोजी जामीन मंजूर केला.

संबंधित बातमी:

Tahawwur Rana Extradition: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार; मुंबई अन् दिल्लीत कोठड्या सज्ज

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget