Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : भारताने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून तिसरा टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावला.

Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : भारताने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) 96 धावांनी पराभव करून तिसरा टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 255 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड 159 धावांत गारद झाला. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चार विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताच्या विजयात सर्व खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी, खेळाडूंमागील प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) रणनीती भारताच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने भारताच्या विजयानंतर आश्चर्यकारक शब्दांत भारताच्या क्रिकेट व्यवस्थेचे कौतुक केले आणि म्हणाला, 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका.
भारत जिंकताच शोएब अख्तर का बोलला?(Shoaib Akhtar On Team India)
भारतीय संघाच्या विजयानंतर एका पाकिस्तानी चॅनेलच्या शोमध्ये तज्ज्ञ म्हणून बोलताना शोएब अख्तर म्हणाला, भारताने योग्यवेळी योग्य खेळाडूंना संधी दिल्या. त्याने विशेषतः संजू सॅमसनचा उल्लेख केला. संजूवर विश्वास होता आणि त्याला वरच्या क्रमात फलंदाजीसाठी पाठवणे हा एक उत्तम निर्णय होता. 15 खेळाडू निवडले जातात. खूप खेळाडू वगळले जातात. अगदी दिग्गज खेळाडूंनाही वगळले जाते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे उदाहरण घ्या...त्यांनी दोघांनाही वगळले आणि आता विश्वचषक जिंकला आहे.
🚨 Very Rare that a Pakistani praising India 😭
— 𝑨𝑻10 (@Loyalsachfan10) March 8, 2026
SHOAIB AKHTAR 🗣️ -
• India's policy won, India's System won, India's merit won.
• Praised Gautam Gambhir for picking guys on merit
• Management said good bye to Rohit and Kohli and now they won the World Cup( kya bol Raha… pic.twitter.com/GqRhsXqC29
शोएब पुढे म्हणाले, भारतात ज्या पद्धतीने क्रिकेट पायाभूत सुविधा बांधल्या जात आहेत ते कौतुकास्पद आहे. भारताला जर आगामी 2027 चा विश्वचषक आजच मिळत असेल तर तो त्यांनी आजच घेऊन टाकावा" त्याच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडू खळबळून गेले आहेत.
गौतम गंभीरचं कौतुक करत काय म्हणाला शोएब अख्तर? (Shoaib Akhter On Team India)
शोएब अख्तर म्हणाला की, गौतम गंभीरने दाखवून दिले की जर तुम्ही योग्य प्रतिभेला संधी दिली तर चांगले निकाल मिळतात. भारतीय संघात दाखवलेला समन्वय अद्भुत होता. तीन माजी कर्णधार मैदानावर एकत्र होते, एकमेकांचा आदर करत होते आणि एकत्र आनंद साजरा करत होते. यावरून संघात किती एकता आहे आणि त्यांच्या ज्येष्ठांबद्दल किती आदर आहे हे दिसून येते.
हे ही वाचा -




















