(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Covid Update : जिल्ह्यात दिवसभरात 146 नवे कोरोनाबाधित, 863 सक्रिय बांधितांची नोंद
मंगळवारी दिवसभरात 146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आज 92 लोकांनी कोरोनावर मात केली. सध्या 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 842 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
Nagpur : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात 146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात शहरातील 100 आणि ग्रामीणमधील 46 नव्या बाधितांचा समावेश आहे. आज 92 लोकांनी कोरोनावर मात केली. सध्या 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 842 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
मंगळवारी शहरातील 82 तर ग्रामीणमधील 10 बाधितांनी कोरोनावर मात केली. सध्या नागपूर महानगरपालिका हद्दीत म्हणजेच शहरात 597 तर ग्रामीण भागात 266 कोरोनाबाधित सक्रिय आहेत. मंगळवारी 1404 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 1041 शहरात तर 363 ग्रामीणमध्ये करण्यात आल्या. दुसरीकडे 482 रॅपीड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 311 शहरात तर 171 ग्रामीणमध्ये झाल्या. सध्या स्थितीत 842 कोरोना बाधित गृहविलगीकरणात आहेत. तर 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 6, मेयो रुग्णालयात 1, किंग्सवे हॉस्पिटलमध्ये 5, रेल्वे हॉस्पिटलमध्ये 2, लता मंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे 2, तर गंगा केअर हॉस्पिटलमध्ये 2 रुग्ण आणि मेडिट्रीना रुग्णालयात 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 2435 नव्या रुग्णांची नोंद तर 2882 रुग्ण कोरोनामुक्त
बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
नागपूर: नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी 13 जुलै रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.