Women Health: दाम्पत्याचा पराक्रम! Whats App ग्रुपच्या मदतीने पत्नीची घरीच प्रसूती? गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Health: धक्कादायक बाब म्हणजे, तिसऱ्या मुलाच्या वेळी गरोदर राहिली, तेव्हा या जोडप्याने वैद्यकीय तपासणी टाळण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही चाचण्या केल्या नाहीत.
Women Health: मुलाला जन्म देणं म्हणजे कोणत्याही महिलेसाठी दुसरा जन्म म्हटला जातो. कारण त्यावेळी तिला होत असलेल्या वेदना, शारिरीक तसेच मानसिक बदल या गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नाही, पण आपल्या बाळासाठी स्त्री हे सर्वकाही स्वीकारते. गरोदर असताना आणि प्रसुतीनंतरच्या काळात महिलेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय चाचणी आणि अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. प्रसुतीची वेळ येतात सर्वप्रथम डॉक्टरांना कळवणं गरजेचं असतं पण चेन्नईमधील एका जोडप्याने असा पराक्रम केला आहे की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत कारवाई करणार आहेत. या जोडप्याने आपल्या नवजात बाळाची घरीच प्रसूती केली आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरून मिळालेल्या सल्ल्यानुसार घरीच प्रसूती केल्याचे जाहीर केले. आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Whats App ग्रुपच्या मदतीने पत्नीची घरीच प्रसूती
एका रिपोर्टनुसार, हे जोडपे एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. या गटात 1,000 पेक्षा जास्त लोक आहेत. या जोडप्याने कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला न घेता ग्रुपने दिलेल्या सूचनांचे पालन करून घरीच बाळाला जन्म दिला. या घटनेकडे सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष लागले आहे.
तिसऱ्या मुलाच्या वेळेस गरोदर राहिली तेव्हा..
मनोहरन, वय 36, आणि त्यांची पत्नी सुकन्या, वय 32, 'होम बर्थ एक्सपिरियन्स' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा भाग आहेत. असे म्हणतात की हा ग्रुप अशा पोस्टने भरलेला आहे. ज्यामध्ये घरी मुलाला जन्म कसा द्यावा याबद्दल सल्ला दिला जातो. यावर विसंबून, जेव्हा सुकन्या त्यांच्या तिसऱ्या मुलाच्या वेळेस गरोदर राहिली तेव्हा या जोडप्याने वैद्यकीय तपासणी टाळण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण गर्भधारणेदरम्यान कोणत्याही चाचण्या केल्या नाहीत. 17 नोव्हेंबर रोजी सुकन्याला प्रसूती वेदना होत असताना तिने रुग्णालयात जाण्याऐवजी व्हॉट्सॲप ग्रुपची मदत घेण्याचे ठरवले. मनोहरन यांनी स्वतः पत्नीची प्रसूती करून घेतली. ही बाब परिसरातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांत दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
या दाम्पत्याविरुद्ध कुंद्रथूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, मनोहरन यांच्या कृतीने वैद्यकीय सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी या जोडप्याची चौकशी केली असता त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपची माहिती मिळाली.
हेही वाचा>>>
Women Health: गरोदर महिलांच्या 'या' चुकांमुळे बाळाचा चेहरा बिघडू शकतो? गर्भावर होतो परिणाम? अभ्यासात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )