एक्स्प्लोर

Women Safety Travel : रात्रीचा प्रवास असो, की एकटीचा...भारतीय रेल्वे महिलांना देते 'या' विशेष सुविधा, माहित नसेल तर जाणून घ्या..

Travel : आपल्या देशात महिलांची सुरक्षा हा अजूनही गंभीर विषय आहे. महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय. भारतीय रेल्वेशी संबंधित अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, जे फक्त महिलांसाठी बनवण्यात आले आहेत.

Women Safety Travel : कोलकाता महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना असो, किंवा बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार..आपल्या देशात महिलांची सुरक्षा हा अजूनही गंभीर विषय आहे, अजूनही काही ठिकाणी महिलांना रात्री 8 नंतर घराबाहेर पडणे सुरक्षित वाटत नाही. मेट्रो सिटीतील महिलांबाबत बोलायचं झालं तर, काही सुशिक्षित आणि स्वतंत्र महिलांना एकट्याने प्रवास करणे खूप आवडते. स्वतःच्या इच्छेने एकट्याने प्रवास करणे, नवीन ठिकाणं पाहणे, नवे अनुभव घेणे यातून महिलांना नवा अनुभव मिळतो. मात्र सध्या महिलांची जी स्थिती आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेले गुन्हे, यामुळे महिला कुठेतरी कमकुवत होत आहेत. त्यांचे धैर्य दडपले जात आहे, तसेच महिलांसाठी, एकट्याने बाहेर पडणे म्हणजे सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.

महिलांनी एकट्याने प्रवास करणे मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही

आता एकट्याने प्रवास करणे हे महिलांसाठी मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. एकट्याने प्रवास करण्याचे नियोजन केल्यावर मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या कुटुंबाने सोलो ट्रिपला होकार दिला असेल तर, ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल किंवा एकट्याने प्रवास करण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेशी संबंधित अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, जे फक्त महिलांसाठी बनवण्यात आले आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र काउंटर आणि कंपार्टमेंट

भारतीय रेल्वेने महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी महिला काउंटर आणि स्वतंत्र डब्यांसह विशेष व्यवस्था केली आहे. महिला काउंटरवर महिला सहजपणे आणि गर्दी न करता तिकीट बुक करू शकतात. लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डब्बे आहेत, जिथे फक्त महिलाच प्रवास करू शकतात. त्यांची सुरक्षा आणि आराम लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सुविधांमुळे महिला कोणत्याही गैरसोयीशिवाय सुरक्षित आणि आरामात प्रवास पूर्ण करू शकतात.

महिलांसाठी सवलतीच्या दरात तिकिट

भारतीय रेल्वे महिलांसाठी विशेषत: ज्येष्ठ महिलांसाठी सवलतीच्या तिकीट सुविधा पुरवते. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना रेल्वे प्रवास भाड्यात 50% पर्यंत सूट मिळते. या सवलतीचा उद्देश ज्येष्ठ महिलांसाठी परवडणारा आणि सोयीस्कर प्रवास करणे हा आहे, जेणेकरून त्या कोणत्याही आर्थिक काळजीशिवाय स्वतंत्रपणे प्रवास करू शकतील. ही सवलत सर्व श्रेणींमध्ये लागू आहे आणि महिलांना त्यांच्या घरापासून दूरही आरामदायी आणि परवडणाऱ्या प्रवासाचा आनंद घेण्याची संधी देते.

सुरक्षा कर्मचारी आणि महिला पोलिसांचा विशेष बंदोबस्त

महिलांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने सुरक्षा कर्मचारी आणि महिला पोलिस तैनात केले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रात्रीच्या प्रवासादरम्यान हे विशेषतः महत्वाचे आहे. महिला पोलिसांच्या उपस्थितीमुळे महिलांना सुरक्षित वाटते आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळते. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित तर होतोच, शिवाय त्या कोणत्याही काळजीशिवाय प्रवास करू शकतात, असा विश्वासही त्यांना मिळतो. रेल्वेचा हा प्रयत्न महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी दर्शवतो.

महिलांसाठी राखीव कोटा

भारतीय रेल्वेने महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी राखीव कोट्याची व्यवस्था केली आहे. या कोट्याअंतर्गत, ट्रेनमध्ये काही जागा खास महिलांसाठी राखीव असतात, मग त्या स्लीपर असोत किंवा सामान्य वर्गाच्या. या प्रणालीमुळे महिलांना गर्दीच्या ट्रेनमध्ये सहज जागा मिळू शकते आणि सुरक्षितपणे प्रवास करता येईल. हे आरक्षण विशेषतः एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त आहे. रेल्वेचा हा उपक्रम महिलांच्या गरजा समजून घेऊन त्यांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे

हेही वाचा>>>

Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget