एक्स्प्लोर

नाश्त्यासाठी पोहे खाल्याने होऊ शकतं वजन कमी; पण कसं?

नाश्त्यासाठी चवीने खाल्ले जाणारे पोहे वजन कमी करण्यासाठीही ठरतात फायदेशीर, आरोग्याच्या अनेक समस्याही होतात दूर

मुंबई : सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो, असं अनेकदा आपण ऐकलं आहे. एवढच नाहीतर अनेक संशोधानांमधूनही ही बाब सिद्ध झाली आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण स्वतःला हेल्दी अन् फिट ठेवण्यासाठी धडपडत असतो. अशातच फिट राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्ताही हेल्दी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजण वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. भारतात नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे, पोहे. पण तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्यासाठी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ, वजन कमी करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया पोह्यांच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत... पोहो पचण्यास हलके असतात. तसेच, पोह्यांमुळे सतत भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही आणि पोटही बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून बचाव होतो. पोहे रक्तप्रवाहात ग्लूकोज संथ गतीने रिलीज करतं. ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. एक वाटी पोह्यांमध्ये जवळपास 206 कॅलरी असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर पोहे तयार करताना त्यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याऐवजी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि इतर भाज्यांचा वापर करा. पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. नाश्त्यासाठी पोहे खाणं हा उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. यामध्ये 75 टक्के कार्बोहायड्रेट, 23 टक्के फॅट्स आणि जवळपास 8 टक्के प्रोटीन असतं. तसेच पोह्यांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सहित अनेक महत्त्वपूर्ण खनिज मुबलक प्रमाणात असतात. टिप : वरील माहिती रिसर्चच्या आधारावर देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असंत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

संबंधित बातम्या : 

हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget