Arvind Kejriwal Special Report : सत्तेसाठी भाजपनं बदनाम केल्याचा केजरीवालांचा आरोप
Arvind Kejriwal Special Report : सत्तेसाठी भाजपनं बदनाम केल्याचा केजरीवालांचा आरोप
नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणं आणि त्या आरोपांसाठी तुरुंगात राहावं लागणं, हा कुठल्याही राजकीय नेत्यासाठी अत्यंत आव्हानात्मक काळ असतो. मात्र जेव्हा त्या आरोपांमधून नेत्याची निर्दोष मुक्तता होते, तो क्षण मात्र राजकीय कमबॅकची मोठी संधी ठरते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत काहीसं असंच घडताना दिसतंय. गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात असणाऱ्या केजरीवालांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर भावूक झालेल्या केजरीवालांनी पुढच्या काही तासात भाजप आणि मोदी-शाहांना टार्गेट करायला सुरुवात केलीय. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
तब्बल १५६ दिवस तुरुंगात राहिलेल्या केजरीवालांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आणि त्यानंतर केजरीवालांच्या अश्रूंचा असा बांध फुटला.
कथित मद्यघोटाळा प्रकरणात दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या इतर चार नेत्यांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती.
मात्र सीबीआयला केजरीवाल यांच्यावरचे आरोप सिद्ध करणारा एकही पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही.
त्यामुळं अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं निर्दोष मुक्तता केली.
All Shows


































