एक्स्प्लोर

ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार

सतत बदलणाऱ्या शिफ्टमुळे अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. एवढच नाहीतर अनेक मानसिक आजारही जडण्याची शक्यता असते.

मुंबई : जास्तीत जास्त प्रायवेट कंपन्यांमध्ये 24x7 तासांची शिफ्ट म्हणजेच, दिवसाचे चोवीस तास काम करण्याची पद्धत रूढ होत आहे. अनेक लोकांना नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं किंवा प्रत्येक आठवड्याला त्यांच्या काम करण्याची वेळ बदलत असते. म्हणजेच, कधी मॉर्निंग तर कधी इव्हिनिंग अन्यथा नाईट, अशा सर्व शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. अशातच जर तुम्ही अशाच शिफ्टमध्ये काम करत असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण कामची वेळ सतत बदलत राहिल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका अधिक वाढतो. एवढच नाहीतर अनेक मानसिक आजारांनाही निमंत्रण मिळतं. डिप्रेशन किंवा नैराश्य ब्रिटनमधील एका यूनिवर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध होत आहे की, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन किंवा नैराश्याची शक्यता 33 टक्यांनी अधिक असते. विशेषतः त्या लोकांच्या तुलनेत ज्या लोकांची शिफ्ट 9 ते 5 असते किंवा ज्या व्यक्ती नाइट शिफ्टमध्ये काम करत नाहीत. मानसिक आजारांचा धोका वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्येही मानसिक आरोग्याच्या समस्यांनी पीडित असण्याची शक्यता 28 टक्क्यांनी अधिक असते. ही आकडेवारी मागील 7 संशोधनांमध्ये सहभागी करण्यात आलेल्या व्यक्तींवर केलेल्या निरिक्षणांवरून सादर करण्यात आली आहे. चिडचिड आणि मूड स्विंग्स संशोधकांच्या मते, सतत शिफ्टमध्ये बदल होत असल्याने आपली झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीवर परिणाम होतो. आपलं शरीराला झोपण्याच्या किंवा उठण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल सहन होत नाहीत. त्यामुळे अनेकांना चिडचिड आणि मूड स्विंग्स यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच यामुळे व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर आणि नातेसंबंधांवरही परिणाम होतो, परिणामी मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. डायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोम जपानमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करतात. त्यांना दिवसा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत डायबिटीस होण्याचा धोका 50 टक्के अधिक असतो. तसेच अशा व्यक्तींमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यामध्ये अनेक प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स जसं, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि अनहेल्दी कोलेस्ट्रॉल लेव्हल यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. व्यायाम करा, कुटुंबीयांसाठी वेळ द्या संशोधकांनी असं सांगितलं आहे की, डिप्रेशन किंवा इतर मानसिक आजारांपासून बचाव करण्यासाठी व्यायाम हा उत्तम उपाय ठरतो. त्यामुळे तुमच्या बीझी शेड्यूलमधून व्यायामासाठी वेळ काढा. तसेच कुटुंबीयांनाही काही वेळ द्या. या गोष्टींमुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते. टिप : सदर गोष्टी संशोधनांमधून सिद्ध झाल्या आहेत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
Embed widget