एक्स्प्लोर

शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स

शरीरात आयर्नची कमतरता उद्भवल्यामुळे अ‍ॅनिमिया सारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं.

मुंबई : 2017च्या आकडेवारीनुसार, 50 टक्के भारतीय महिला अ‍ॅनिमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. आपल्या आहारात आयर्नचा योग्य समावेश तसेच आयर्न सप्लिमेंट्सचा वापर करून अ‍ॅनिमियासारखी समस्या दूर करणं सहज शक्य होतं. परंतु, आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं. जाणून घेऊया आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. अ‍ॅनिमिया म्हणजे काय? रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अ‍ॅनिमिया असं म्हणतात. या आजाराला पंडुरोग असंही म्हटलं जातं. अ‍ॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. अ‍ॅनिमियाची लक्षणं प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळून येतात. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. अ‍ॅनिमिया एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या रक्त पेशींची संख्या कमी होते. दररोज किती आयर्न शरीरासाठी आवश्यक? एनएचएस (राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा)नुसार, प्रोढ पुरूषांना दररोज जवळपास 8.7 मिलीग्राम आयर्नची आवश्यकता असते. तर प्रोढ महिलांना 14.8 मिलीग्राम आयर्नची गरज असते. परंतु, 50 पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये किंवा रजोनिवृत्तीनंतर महिलांना दररोज 8.7 मिलीग्राम आयर्नची गरज असते. आयर्नच्या कमतरतेची लक्षणं :
  • थकवा जाणवणं
  • श्वास घेण्यास त्रास होणं
  • त्वचा पिवळी पडणं
  • दम लागणं
  • चिडचिडेपणा
  • एकाग्रता कमी होणं
  • रोगप्रतिकार शक्ती कमी होणं
आयर्नचा उत्तम स्त्रोत असणारे पदार्थ : काही पदार्थांच्या मदतीने शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, मांस-मासे, अंडी, डाळी यांसारखे पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असतं. अ‍ॅनिमिया दूर करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच ते नियंत्रणात ठेवता यावे यासाठी लोह तसेच प्रथिनेयुक्त आहाराची गरज असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य, डाळी, सुकामेवा, गूळ, फळे, टरबूज यांचा प्रामुख्याने समावेश असावा. शाकाहरी व्यक्तीला अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी दूध आणि लोहयुक्त पदार्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. मांसाहारी व्यक्तीने मासे, मटन, चिकन, अंडी यांचा वापर नियमित करावा. टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. संबंधित बातम्या :  हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं? ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget