फराह खानच्या नवऱ्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ! डिट्टो कार्तिक आर्यनची कॉपी..नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले
स्टायलिश सूटमध्ये अतिशय फिट आणि स्मार्ट लुकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा नवा अवतार पाहून अनेकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

Farah khan Husband fitness transformation: फराह खानचे पती आणि चित्रपट निर्माते शिरीष कुंदर सध्या त्यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या नव्या लुकने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली आहे. अलीकडेच शिरीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये त्याचा पूर्ण बदललेला अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. काही फोटोमध्ये तो शर्टलेस दिसतो, तर काहींमध्ये स्टायलिश सूटमध्ये अतिशय फिट आणि स्मार्ट लुकमध्ये दिसतो. त्याचा हा नवा अवतार पाहून अनेकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.
Shirish kundar: सोशल मीडियावर एकच चर्चा
सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक चाहते त्याच्या फिटनेसचं कौतुक करत त्याला “एजिंग बॅकवर्ड” म्हणत आहेत. तर काही जण हा बदल खरा आहे की फोटोशॉप किंवा AIची करामत, असा सवाल उपस्थित करत आहेत. काही नेटिझन्सचं तर म्हणणं आहे की वजन घटवल्यानंतर शिरीष काही फोटोंमध्ये कार्तिक आर्यन सारखा दिसतो.
View this post on Instagram
दरम्यान, एका फोटोमध्ये शिरीष बिझनेस क्लास फ्लाइटमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसला. या फोटोवर त्याची पत्नी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान हिने मजेशीर कमेंट केली “कुठे निघालायस?” तिच्या या कमेंटमुळे चर्चेला आणखी उधाण आलं.
शिरीष कुंदर नेहमी लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. त्याने ‘मैं हूं ना’ आणि ‘जोकर’सारख्या चित्रपटांत एडिटिंग व दिग्दर्शन केलं आहे. मात्र यावेळी तो त्याच्या कामामुळे नव्हे, तर नव्या लुकमुळे चर्चेत आला आहे. नेहमी कॅमेऱ्यामागे राहणाऱ्या शिरीषने अलीकडील इन्स्टाग्राम पोस्ट्समुळे अचानक सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.फराह खानच्या पतीने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली असून त्याच्या बदललेल्या जॉलाइन, फिट शरीरयष्टी आणि एकूण लुकबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक वर्षे त्याने लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे अचानक शेअर झालेल्या या फोटोंच्या सिरीजमुळे त्याच्या फॉलोअर्सना खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला आहे.





















