Amol Mitkari: 'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
Amol Mitkari: प्रश्न विचारणे आणि या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर हे बोलणं योग्य नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला.

Amol Mitkari on Dhananjay Munde: अजित पवारांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार, आज (28 फेब्रुवारी) निधनाला एक महिना झाला. मात्र, पुढे जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा निर्धार आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेवरून घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार जर चमकोगिरी करत असतील तर मग मी पण हे प्रश्न विचारून चमकोगिरी करतो आहे का? प्रश्न विचारणे आणि या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर हे बोलणं योग्य नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला आहे.
पण आता अजित पवार आमच्यात नाहीत
राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असतील तर त्यांच्यासोबत मी असेन, असे मिटकरी यांनी नमूद केले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवारांची आठवण आली नाही. अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील आमच्याशी चर्चा करतील, देवगिरीला बैठकीला आमच्या सगळ्या आमदारांना बोलवतील पण आता अजित पवार आमच्यात नाहीत, अशी खंत मिटकरी यांनी बोलून दाखवली.
तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय?
मिटकरी म्हणाले की, रोहित पवारांच्या सोबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या सोबत मी आहे, रोहित पवारांचा जसा काका केला तसा सुद्धा माझा जवळचा माणूस गेला आहे. त्यामुळे मी प्रश्न विचारणार आणि कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्या सोबत असला तरी त्याला सोबत घेणार, असा निर्धार व्यक्त केला. मला आमच्याच पक्षातील नेते बोलत आहेत, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहित नाही ते असं का बोलतात पण मला जे योग्य वाटतं ते मी करत असल्याचे मिटकरी म्हणाले. माझ्या पक्षातील काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत हे मी सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
अजित पवारांची पोकळी त्या भरून काढतील
दरम्यान, सुनिता पवार यांना तुम्ही सहा महिने द्या अजित पवारांची पोकळी त्या भरून काढतील अनेक सक्षम नेतृत्व महाराष्ट्रला देतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या

























