एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात कलिंगड सगळेच खातात; पण 'या' वेळी खाल तर मिळतील आश्चर्यकारक फायदे

Watermelon Benefits : कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे ते तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यात मदत करते

Watermelon Benefits : उन्हाळा सुरु झाला आहे. अशातच बाजारात हंगामी फळं दिसायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात एक फळ आवर्जून खाल्लं जातं ते म्हणजे कलिंगड (Watermelon). हे एक असं फळ आहे की ते खाल्ल्याने उन्हाळ्यात अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात ताजी फळे खाल्ल्याने भरपूर पोषण आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. 

कलिंगड हे रसाळ फळ आहे. कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. मात्र, कलिंगड खाताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हे फळ सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळीही खाऊ शकता. पण, तुम्ही रात्री कलिंगड खात असाल तर यामुळे तुमचं पोट खराब होऊ शकतं.    

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कलिंगडमधील व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनची पातळी निरोगी त्वचा आणि केसांना प्रोत्साहन देते. कलिंगड शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ दूर करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास मदत 

कलिंगड गोड आहे, त्यामुळे त्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते असा गैरसमज काही लोकांमध्ये असतो. पण अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, 100 ग्रॅम कच्च्या कलिंगडमध्ये फक्त 6.2 ग्रॅम साखर असते. त्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन वाढण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. 

हृदयाचं आरोग्य सुधारतं

कलिंगडमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे हृदय निरोगी ठेवतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की लाइकोपीन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब राखण्यास मदत करू शकते. याशिवाय कलिंगडमध्ये एमिनो अॅसिड सिट्रुलीन, नायट्रिक ऑक्साईड असते ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.

दृष्टीसाठी फायदेशीर

लाइकोपीन तुमच्या दृष्टीसाठीही उत्तम आहे. संशोधनानुसार, लाइकोपीनचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) टाळण्यास मदत करू शकतात.

दातांची काळजी 

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कलिंगड खाल्ल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतात आणि हिरड्यांचे बॅक्टेरियापासून संरक्षण होते. हे तुमचे दात पांढरे करण्यास देखील मदत करते आणि तुमचे ओठ कोरडे किंवा क्रॅक होण्यास प्रतिबंध करते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Workout Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget