Vat Purnima 2022 : उद्या वटपौर्णिमेचा सण! धन्याच्या दिर्घायुष्यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व
Vat Purnima 2022 : ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावर्षी हे व्रत मंगळवारी 14 जून (उद्या) या दिवशी ठेवण्यात येणार आहे.
![Vat Purnima 2022 : उद्या वटपौर्णिमेचा सण! धन्याच्या दिर्घायुष्यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व Vat Purnima 2022 know puja tithe muhurta and importance of the day 2022 Vat Purnima 2022 : उद्या वटपौर्णिमेचा सण! धन्याच्या दिर्घायुष्यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/4120b8254a590a52557786f45e013217_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vat Purnima 2022 : हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावर्षी हे व्रत मंगळवारी 14 जून (उद्या) या दिवशी ठेवण्यात येणार आहे. स्त्रिया या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
हिंदू धर्मात वटवृक्षाला फार महत्त्व दिले जाते. कारण वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. तसेच वटवृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. तर, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या काही राज्यांमध्ये या व्रताला वट सावित्री व्रत असे म्हणतात. वट पौर्णिमा व्रत आणि वट सावित्री व्रत सारखेच आहेत, दोन्ही सावित्रीमध्ये सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा केली जाते. वट पौर्णिमेचं व्रत केल्याने अखंड सौभाग्य लाभते असं मानलं जातं. तसेच संसारातही भरभराट व्हावी, सुख संपत्ती लाभावी यासाठी वट पौर्णिमेचं व्रत केलं जातं.
वट पौर्णिमा व्रत, पूजा,तिथी आणि शुभ मुहूर्त
वट पौर्णिमा व्रत तारीख : 14 जून, सोमवार
वट पौर्णिमा व्रत तिथी सुरू होते : 13 जून, सोमवारी रात्री 09:02
पौर्णिमा तिथी समाप्त : मंगळवार, 14 जून संध्याकाळी 05.21 वाजता
वट पौर्णिमा व्रत पूजेची शुभ वेळ : सकाळी 11:00 ते दुपारी 12:15
वट पौर्णिमा व्रताची तारीख : 15 जून 2022 , बुधवार
या दिवशी महिलांनी सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती वटवृक्षाखाली ठेवावी. त्यांची पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)