एक्स्प्लोर

Relationship Tips : रिलेशनशिपमुळे येतोय तणाव? मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतोय? कसे टाळावे? 

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये असताना चिंता निर्माण होऊ शकते. ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. याला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Relationship Tips : कोणत्याही नात्याचा धागा हा नाजूक असतो, नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. आणि नातं म्हटलं म्हणजे जोडीदारांच्या एकमेकांकडून अपेक्षा आणि तडजोड ही आलीच. त्यामुळे कोणतेही नाते पूर्णपणे परिपूर्ण नसते. कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात. पण एकमेकांचा आधार आणि विश्वास कायम राखणे महत्त्वाचे आहे. काहीवेळा नात्यात चढ-उतार इतके होतात, की ते चिंता आणि तणाव निर्माण करतात, ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. या काळात व्यक्ती नेहमी आपल्या नात्याबद्दल चिंताग्रस्त राहतो. शिवाय, त्याच्या मनात सतत प्रश्न येत असतात. जसे की 'आपले नाते टिकेल का?, माझा जोडीदार नेहमी माझ्यावर प्रेम करेल का? आपण वेगळे होऊ का? वैगेरे वैगेरे... बऱ्याच वेळा या गोष्टी माणसावर इतक्या वर्चस्व गाजवू लागतात, की त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. आज हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया नातेसंबंधांच्या चिंतेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

नात्यात चिंता असणे सामान्य आहे?

नातेसंबंधाची चिंता पूर्णपणे सामान्य आहे, कारण जेव्हा तुम्ही नवीन रिलेशनमध्ये असता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात. तसेच, ही चिंता बहुधा नात्याच्या सुरुवातीला दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच वर्षांनंतरही रिलेशनची चिंता असेल तर ती काही भूतकाळातील अनुभवाशी संबंधित असू शकते. पण जर वेळोवेळी चिंता वाढत गेली तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये समस्याही वाढू शकतात.

जोडीदारांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात?

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराबद्दल शंका, त्याला गमावण्याची भीती, त्याच्या भावनांबद्दल संभ्रम अशा भावना येऊ लागतात. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनात असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात -
मी माझ्या जोडीदारासाठी योग्य आहे का?
मला माझ्या जोडीदारासाठी काही फरक पडतो का?
त्याला माझ्याबद्दल भावना आहेत का?
हे नाते जास्त काळ टिकेल का?

नात्यात चिंता वाढण्याची कारणं कोणती असू शकतात?

नातेसंबंधात चिंता वाटणे हे मागील काही वाईट अनुभवामुळे देखील असू शकते. व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबद्दल आत्मविश्वास नसणे किंवा स्वतःवर कमी विश्वास असणे हे देखील कारण असू शकते. याशिवाय वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही समस्यांमुळेही नात्यांबाबत मनात चिंता निर्माण होऊ शकते.

रिलेशनशिप एंग्जायटीचा सामना कसा करावा?

असे प्रश्न तुमच्या मनात का येत असतील तर एकमेकांचे विचार समजून घ्या, यामुळे तुमची समस्या सोडवण्यास मदत होईल.
तुमच्या जोडीदारापासून तुमच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि तुमच्या समस्या सांगा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समजतो.
तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर रिलेशनशिप एक्सपर्टशी बोला.

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget