एक्स्प्लोर
Propose day: प्रपोज डे दिवशी मुलींना असं करा प्रपोज!
नवी दिल्ली: 'व्हॅलेंटाईन डे'ची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रेमी युगलांमध्ये एक प्रकारची उत्सूकता लागून आहे, की आपला प्रियकर आपल्याला कशाप्रकारे प्रपोज करेल. त्यातच आज प्रपोज डे असल्याने अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीला कशाप्रकार प्रपोज करावं? या विचारात असतील. तेव्हा प्रपोज डेच्या निमित्ताने आज तुम्हा काही अशा टिप्स सांगणार आहोत. विशेष म्हणजे या टिप्स एका संशोधनातून समोर आल्या आहेत.
ब्रिटेनमध्ये यासंदर्भात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दोन हजार मुलींना प्रश्न विचारण्यात आले. या नव्या संशोधनानुसार जे निष्कर्ष काढण्यात आले त्यामध्ये अनेक तरुणींना तिच्या प्रियकरानं लग्नासाठी तयार असल्याबद्दल एखादं ठोस कमिटमेंट देत नाही, तोपर्यंत ती तरुणी आपल्या पालकांना जोडीदारविषयी सांगत नाही.
तरुणींना अशाप्रकारे केलेलं प्रपोज आवडतं
- एखादा तरुणाला तरुणीशी लग्न करायचे असल्यास, त्याने एकांत ठिकाणी तिला प्रपोज करावं, असं अनेक तरुणींना वाटतं.
- तसेच त्याने तिला अशा ठिकाणी प्रपोज करावे, ज्यामुळे त्याची प्रेयसीला सदैव आठवण राहिल अशा ठिकाणी करावं.
- प्रेयसीला लग्नाची मागणी घालताना तिला अश्चर्याचा सुखद धक्का बसावा
- प्रपोज करण्यापूर्वी प्रियकराने स्वत:च अंगठीची निवड करावी
- तीन वर्षाच्या रिलेशनशिपनंतरच प्रपोज करावे, यासोबतच प्रपोजलनंतर लग्नासाठी तीन महिनेच असावेत.
- प्रियकरांने प्रपोज करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिने पूर्वी नियोजन करावे.
- लग्नासाठी मागणी घालताना प्रियकराने गुडघ्यावर बसून प्रपोज करावे. तसेच डेटिंगदरम्यान लग्नाच्या विषयावर पुष्कळ चर्चा करावी.
- लग्नापूर्वी प्रत्येक तरुणीला आपल्या जोडीदारासोबत राहावे वाटत असते. तसेच दोघांनाही कॅज्युअल कपडे परिधान करावे, असा दोघांचा आग्रह असतो.
- 19 टक्के तरुणींना आपला प्रियकर प्रपोज करताना थोडा दु: खी असावा वाटतं.
- तर 10 टक्के तरुणींना त्यांचा प्रियकर प्रपोज करताना गाण म्हणून प्रपोज करावं असं वाटत असतं.
- तसेच 7 टक्के तरुणींना त्यांच्या प्रियकराने तिच्यावर कविता करावी असं वाटत असतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement