Propose Day 2022 : प्रपोजच्या डे च्या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला 'या' भेटवस्तू द्या आणि प्रेम व्यक्त करा!
Propose Day 2022 : व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना 'या' भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करा.
Propose Day 2022 : आजपासून संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा सीझन सुरु झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे. दरवर्षी 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी मुलं-मुली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात. तुम्हाला जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला इंम्प्रेस करायचं आहे किंवा तुमचं प्रेम व्यक्त करायचं आहे. तर हा दिवस तुमच्यासाठीच आहे. प्रपोज करताना कोणत्या भेटवस्तू देऊन तुमच्या पार्टनरला खुश करता येईल याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1. पुष्पगुच्छ (Bouquet)
पुष्पगुच्छ हे बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. टवटवीत, बहरणारी सुगंधी फुलं पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तसेच, चेहऱ्यावर छान स्मितही फुलतं. मुली अशा रंगीबेरंगी फुुलांच्या कायम प्रेमात असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला छानसं पुष्पगुच्छ देऊनही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता.
2. फ्रेम स्क्रॅपबुक (Scrapbook)
स्क्रॅपबुक हा असा आठवणींचा ठेवा आहे जो प्रत्येकाला जुन्या आठवणींत घेऊन जातो. अशा वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला स्क्रॅपबुकची फ्रेम देऊन इंम्प्रेस करू शकता. तसेच तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. तुमच्या जोडीदाराला ही भेटवस्तू नक्कीच स्पेशल फिलींग करून देईल.
3. अंगठी (Ring)
तुमच्या जोडीदारावरील तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी रिंग हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. रिंग हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता दे दर्शवणारं एक माध्यम आहे. त्यामुळे रिंग हा देखील पर्याय तुम्ही भावना व्यक्त करण्यासाठी निवडू शकता.
4. ज्वेलरी
दागिने किंवा ज्वेलरी ही अशी भेटवस्तू आहे जी प्रत्येक मुलीला खूप जवळची आहे. अशा वेळी जास्त महागडं गिफ्ट न देता तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा आवडत्या व्यक्तीला एखादं छानसं ब्रेसलेट किंवा लॉकेट जरी भेट दिलं तरी ती तुमच्यावर इंम्प्रेस होऊ शकते. त्यामुळे ही संधी गमावू नका.
5. हॅन्डबॅग्स
मुलींना अनेक वस्तूंची आवड असते आणि याच आवडीच्या वस्तूंचा साठा मुलींना करायला आवडतो. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मुलीकडे एकापेक्षा जास्त बॅग असतेच. पण तरीही प्रत्येक बॅग तिच्यासाठी तितकीच स्पेशल असते. कारण त्यामागे त्यांची इमोशनल आठवण असते. एक अटॅचमेंट असते. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीची हॅन्डबॅग तुमच्या जोडीदाराला दिली तर नक्कीच ती एक स्पेशल फिलींग असेल. ही खास बॅग गिफ्ट करून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी
- Rose Day 2022 : व्हॅलेंटाईन्स वीकमधील 'रोज डे' प्रेमी युगुलांसाठी असतो खास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha