(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी
Valentine Day 2022 : तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू होत आहे.
Valentine Day 2022 : तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला 'प्रेमाचा महिना' म्हणतात. 7 फेब्रुवारीपासून 'व्हॅलेंटाईन वीक' (Valentines Week) सुरू होत आहे. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. तुम्हीही या वर्षी व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची तयारी करत असाल तर जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकमधील खास दिवस.
पहिला दिवस - रोज डे (7 फेब्रुवारी) (Rose Day)
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. पहिला दिवस म्हणजे रोज डे. म्हणजेच, प्रेमाने भरलेल्या सप्ताहाची सुरुवात गुलाबाच्या गंधाने आणि सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमा जोडपे एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी आपल्या मित्रवर्गालाही वेगवेगळ्या रंगांचे गुलाब देऊन हा दिवस साजरा करतात. गुलाबाच्या रंगाचे वेगवेगळे अर्थ आहेत.
दुसरा दिवस - प्रपोज डे (8 फेब्रुवारी) (Propose Day)
व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. जर तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या जोडीदाराला खास पद्धतीने प्रपोज करून तुम्ही तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि उत्साही बनवू शकता.
तिसरा दिवस - चॉकलेट दिवस (9 फेब्रुवारी) (Chocolate Day)
कोणत्याही नात्यात प्रेम असेल तर गोडवा आपोआप विरघळतो. व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. ज्यामध्ये जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात.
चौथा दिवस - टेडी डे (10 फेब्रुवारी) (Teddy Day)
व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना टेडी बेअर भेट देतात. या दिवशी जोडपे एकमेकांना टेडी बेअर (Teddy Bear) भेट देतात.
पाचवा दिवस - प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) (Promise Day)
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता किंवा रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छित असाल तेव्हा तुम्ही एकमेकांना काहीना काही वचन देता. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि बरेच काही वचन देऊ शकता.
सहावा दिवस - हग डे (12 फेब्रुवारी) (Hug Day)
व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.
सातवा दिवस - किस डे (13 फेब्रुवारी) (Kiss Day)
प्रेम व्यक्त करताना आणि शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसताना, प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगू शकतो. म्हणूनच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो.
आठवा दिवस - व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) (Valentine Day)
व्हॅलेंटाईन डे हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. या आठ दिवसांच्या प्रेमपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या रसिकांसाठी 14 फेब्रुवारी हा निकालाचा दिवस आहे.
संबंधित बातम्या :
Rose Day 2022 : व्हॅलेंटाईन्स वीकमधील 'रोज डे' प्रेमी युगुलांसाठी असतो खास
Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha