Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या लूक्स आणि स्टाइलने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
![Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन katrina kaif fitness mantra know her diet plan Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/09/336d4ae22ef59041701da2b88a5e65b7_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Katrina Kaif Fitness Mantra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या लूक्स आणि स्टाइलने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. कतरिना 38 वर्षांची आहे तिच्या फिटनेससाठी ती कोणता डाएट प्लॅन फॉलो करते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. फिगर मेंटेन ठेवण्यासाठी कतरिना दिवसातील काही तास जिममध्ये वर्क आऊट करते. वर्क आऊटसोबत कतरिना तिच्या आहाराकडे देखील विशेष लक्ष देते. तुम्हालाही जर कतरिना सारखी परफेक्ट फिगर आणि फिटनेस हवा असेल, जाणून घ्या कतरिनाचं खास डाएट प्लॅन-
डेअरी प्रोडक्टपासून दूर राहा- रिपोर्टनुसार, कतरिना डेअर प्रोडक्ट्सपासून दूर राहते. डेअर प्रोडक्ट्समुळे चरबी वाढते. तसेच त्यामध्ये असणाऱ्या शुगर आणि फॅट्समुळे वजन वाढते. डेअरी प्रोडक्ट्सच्या ऐवजी तुम्ही सोया मिल्क, बदाम मिल्क आणि स्किम्ड मिल्क यांचा समावेश डाएटमध्ये करू शकता.
रिपोर्टनुसार ब्रेड, पास्ता हे पदार्थ खाणे कतरिना टाळते. ग्लूटन असणारे पदार्थ लवकरच पचत नाहित. त्यामुळे या पदार्थांचा समावेश कतरिना आहारात करत नाही. कतरिना फिगर फिटनेस आणि चेहऱ्यावर ग्लो राहण्यासाठी रोज उकडलेल्या भाज्या खाते. रिफाइंड शूगरमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे कतरिना साखरे ऐवजी गुळ किंवा मध खाते.
View this post on Instagram
टिप टिप बरसा पानी गाण्यात कतरिनाचा ग्लॅमरस अंदाज
कतरिनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या सिनेमाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 23.85 कोटींची कमाई केली. या चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यात कतरिनाचा फिटनेस दिसत आहे. या गाण्यामध्ये कतरिनाच्या ग्लॅमरस लूकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 'सूर्यवंशी' हा चित्रपट देशभरात जवळपास चार हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. तर जगभरात 5200 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)