Hot Water Bath Side-Effects : गरम पाण्याने आंघोळ करताय? मग ही बातमी वाचाच!
Hot Water Bath Side-Effects : तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडत असेल तर यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Hot Water Bath Side-Effects : जवळपास सर्वच जण गरम पाण्याने आंघोळ करतात. गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही फायदे आहेत. परंतु, गरम पाण्याने अंघोळ केल्याने काही प्रमाणात नुकसान देखील होते. अत्यंत गरम पाणी आपल्या त्वचेसाठी ते केसांसाठी खूप हानीकारक आहे. याशिवाय खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुम्ही उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांनाही बळी पडू शकता. त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ करायची असेल तर त्याआधी कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्या आहेत. या टीप्स फॉलो केल्या तर गरम पाण्याने अंघोळ करून देखील त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
Hot Water Bath Side-Effects : त्वचेसाठी हानीकारक
तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर काळजी घ्या. कारण खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमची त्वचा खूप कोरडी होते. त्वचा कोरडी पडल्यामुळे शरीराला खाज सुटू शकते. जर तुम्हाला गरम पाणी वापरायचे असेल तर तुमच्या शरीरावर मॉइश्चरायझर जरूर वापरा. तसेच त्वचेची योग्य काळजी घ्या.
Hot Water Bath Side-Effects : केस गळणे
अनेकांना केस गळण्याची समस्या असते. परंतु खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. कारण गरम पाण्याने केस खूप कोरडे होतात. ज्यामुळे तुम्हाला कोरडे स्कॅल्प आणि केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. हे टाळण्यासाठी आंघोळ करण्यापूर्वी केसांना थोडे तेल लावा. असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.
Hot Water Bath Side-Effects : रक्तदाब
खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो. जर तुम्हाला हायपरटेन्शन (उच्च रक्तदाबाची समस्या) असेल तर तुम्ही खूप गरम पाण्याने अंघोळ करू नये याची काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात.
Hot Water Bath Side-Effects : पाठदुखी
खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुम्ही पाठदुखीच्या समस्येला बळी पडू शकता. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे स्नायू घट्ट होतात. ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.
Hot Water Bath Side-Effects : डिहायड्रेशन
खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुम्ही डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकता. यामुळे जास्त घाम येणे आणि निर्जलीकरण होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या