Mosquito : घरातील डासांना मारणारी मशीन किती वीज वापरते? याचा बिलावर किती परिणाम होतो? वाचा सविस्तर
Mosquito Liquid Machine : डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात आपण मॉस्किटो लिक्विड मशीन लावतो. पण तुम्हाला माहितीये का? या मशीनला किती वीज लागते?
Mosquito Liquid Machine : घरात डास (Mosquito) असतील तर झोपणंही कठीण होऊन जातं. घरात घोंघावणारे डास हे अनेक गंभीर आजारांचं कारणही बनतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या घातक आजारांची निर्मिती डासांपासून होते. डासांमुळे आपल्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी घरात मॉस्किटो किलर मशीनचा वापर केला जातो. हे मशीन वीजेवर चालते. त्यामुळे डासांचा खात्मा होत असल्याचा दावा जाहिरातांमधून केला जातो. पण तुम्हाला माहितीये का? ही मशीन सुरू राहण्यासाठी किती वीज लागते?
मॉस्किटो किलर मशीन वीजेवर चालते. यामध्ये एक लिक्विड रिपेलेंट असतं. ते संपलं की, पुन्हा रिप्लेस करावं लागतं. जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी या मशीनचा वापर करत असाल तर डास मारणाऱ्या या मशीनसाठी किती वीज खर्च होते, तसेच याचा तुमच्या विजेच्या बिलावर किती परिणाम होतो? याची माहिती असणं गरजेचं आहे.
डासांना मारणारं मशीन
गुड नाईट मशीनचे कोणतंही रिफिल 10 रात्रींपर्यंत आपला प्रभाव दाखवतात. जेव्हा हे मशीन सॉकेटमध्ये प्लग केले जाते तेव्हा मशीन गरम होते. गरम झाल्यावर, मशीन रिफिलमधून संपूर्ण खोलीत पसरतं. या मशीनमुळे डास सहज पळून जातात आणि आपल्याला शांत झोप लागते.
95% रॉकेलचा वापर केला जातो
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही घरातील डास दूर करण्यासाठी वापरत असलेल्या इलेक्ट्रिक मशीनच्या रिफिलमधील लिक्विड रॉकेलचं प्रमाण 96.4 टक्के आहे. तसेच, या लिक्विडमध्ये रॉकेल व्यतिरिक्त इतर रसायनांचादेखील वापर केला जातो. मात्र, त्यांचे प्रमाण तुलनेने कमी असते.
एका मशीनमागे किती वीज वापरली जाते?
डासांना मारणारी एक मशीन किती वीज वापरते हे तुम्ही कोणतं मशीन वापरत आहात यावर अवलंबून आहे. पण, बहुतेक डासांना मारणारे मशीन कमी वीज वापरतात. त्याप्रमाणे त्यांची डिझाईन तशी केलेली असते. सामान्यपणे पाहिल्यास, कोणतंही डास मारण्याचे यंत्र साधारणपणे 5 ते 7 व्हॅट वीज वापरते. या डासांना मारणाऱ्या मशीनचा एका महिन्याचा होणारा वीजवापर फार कमी आहे. याचाच अर्थ असा की, या मशीनचा तुमच्या घराच्या एकूण वीज बिलावर फारसा मोठा परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात हे मशीन अगदी सहज वापरू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :