Health Tips : कोलेस्ट्रॉलमुळे वाईट सवयी वाढतात; हृदय निरोगी ठेवायचं असेल तर 'या' गोष्टी लगेच सोडा
Health Tips : कोलेस्ट्रॉलची समस्या जीवनशैलीशीही संबंधित आहे. पण, कोलेस्ट्रॉलला आजकाल लोक फार हलक्यात घेतात.

Cholesterol Symptoms : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. घरी योगा करण्यासाठी वेळ काढू शकत नाही किंवा कोणताही नियमित व्यायाम करू शकत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार शरीरात फोफावत आहेत. यासाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुमची जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलची समस्या जीवनशैलीशीही संबंधित आहे. पण, कोलेस्ट्रॉलला आजकाल लोक फार हलक्यात घेतात. चला जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
चालणे थांबवले नाही पाहिजे
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्यायाम, कठोर परिश्रम थांबवणे. लोक चालणे बंद करतात. आहारात जंक फूड खातात. फॅटयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होऊ लागते. त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवरही दिसून येतो. शिरामध्ये साठलेल्या या चरबीला कोलेस्ट्रॉल म्हणतात.
मद्यपान सोडा
अल्कोहोलचा कोलेस्ट्रॉलशी फार जवळचा संबंध आहे. जे लोक नियमित मद्यपान करतात त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले आढळते. दारू वजन वाढवण्याचे काम करते. पण तुम्ही कोलेस्ट्रॉलचे औषध घेत असाल तर तुम्हाला जास्त त्रास जाणवणार नाही.
केवळ उपाय शोधून कोलेस्ट्रॉल कमी होत नाही
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांचा सल्ला घेत असतात. काही जण ऑनलाईन शोधत राहतात की कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित आहार आणि दैनंदिन योजनेचे पालन करावे लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नियमित व्यायाम, डॉक्टरांची औषधे आणि इतर उपचारांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ.संजीव अग्रवाल यांनी सांगितले की, बिघडत्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. ही चरबी आहे जी शिरामध्ये जमा होते. रक्तवाहिन्यांमधून रक्त हृदयाद्वारे शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचते. परंतु जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते तेव्हा ती रक्तपुरवठ्यात अडथळा बनते. रक्तपुरवठा खंडित होताच हृदयविकाराचा धोका वाढतो. कधीकधी हृदयविकाराचा झटका येतो. कोलेस्ट्रॉल वाढणे हा हृदयविकाराचा धोका असल्याचे डॉक्टर मानतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :























