Travelling Tips : प्रवासात उलट्यांचा त्रास? मग, 'या' दोन गोष्टी ठेवा सोबत, प्रवास होईल सुखकर
How To Avoid Vomiting During Traveling : प्रवासादरम्यान तुम्ही फक्त दोन गोष्टी बॅगमध्ये ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला पर्यटनादरम्यान होणारा उलट्या आणि चक्करचा त्रास कमी होईल.
Travelling Tips : आपल्या सर्वांनाच प्रवास करायला आवडतो. आता डिसेंबरमधील सुट्टीच्या निमित्ताने अनेकांनी फिरण्यासाठी प्लानही केले असतील. पण प्रवास करताना बस, ट्रेन किंवा विमानाने लांबचा प्रवास कधी कधी त्रासाचे कारण ठरते. पर्यटनाची आवड आणि इच्छा असली तरी प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्या, चक्कर येणे आदी त्रास काहींना जाणवतो. त्याचमुळे हा त्रास नको म्हणून अनेकजण प्रवास करणे टाळतात. मोशन सिकनेसमुळे हा त्रास होतो. परंतु, यामुळे तुम्ही सहलीचा प्लान रद्द करू नये. प्रवासादरम्यान तुम्हाला फक्त अशा गोष्टी तुमच्या बॅगेत ठेवायला हव्यात ज्यामुळे उलट्या किंवा चक्कर येण्याची समस्या कमी होऊ शकते.
प्रवासादरम्यान तुम्ही फक्त दोन गोष्टी बॅगमध्ये ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला पर्यटनादरम्यान होणारा उलट्या आणि चक्करचा त्रास कमी होईल.
प्रवासादरम्यान, तुम्ही एक विशेष प्रकारची घरगुती पावडर तयार करून तुमच्या सोबत घेऊ शकता. ज्यामध्ये ओवा, बडीशेप आणि जिरे हे तीन मुख्य घटक असतात. हे तिन्ही समान प्रमाणात घ्या. तेलाशिवाय मंद आचेवर हे तिन्ही घटक भाजावे. ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात एकत्रित करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर बाटलीत भरून किंवा हवाबंद डब्यात ठेवून प्रवास करताना सोबत घेऊ शकता. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला उलट्या किंवा चक्कर अजिबात जाणवणार नाही. त्याशिवाय, तुमच्या पोटासंबंधीची समस्या दूर होईल आणि तुमचा मूडही चांगला ठेवेल. या घरगुती पावडरचा वापर केल्यानंतर, तुम्हाला प्रवास करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
लवंगा भाजून घ्या
फक्त भाजलेल्या लवंगा सोबत ठेवा. लवंगा नीट भाजून घ्या, पावडर करा आणि हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हाही तुम्हाला उलटी, अस्वस्थ वाटत असेल किंवा चक्कर येत असेल तेव्हा ही पावडर चघळा. यामुळे तात्काळ आराम मिळेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यासोबत काळे मीठ देखील घेऊ शकता.
भाजलेल्या लवंगात काळे मीठ घातल्यास चव चांगली येते आणि काळे मीठ देखील त्वरित ऊर्जा देते. काळे मीठ लवंगात मिसळून खाऊ शकता. या दोन गोष्टींमुळे तुम्हाला पूर्ण आराम मिळेल. याशिवाय तुम्हाला औषध किंवा इतर कशाचीही गरज भासणार नाही.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या फक्त माहितीसाठी आहे. नमूद केलेल्या उपचार पद्धती आणि सूचना अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )