एक्स्प्लोर

Share Market: इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा भडका; शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, निफ्टीतही घसरण

Share Market: मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Share Market: मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण (US Israel Attacks Iran) यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी आली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) झाला आहे. सोमवारी प्री-ओपनिंग सत्रातच शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली.

Share Market: प्री-ओपनिंगमध्ये मोठा धक्का

प्री-ओपनिंग सत्रात BSE Sensex तब्बल 2,700 हून अधिक अंकांनी कोसळला. काही वेळासाठी बाजारात मोठी घबराट पसरली होती. सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. तसेच NIFTY 50 निर्देशांकही प्री-ओपनिंगमध्ये 500 हून अधिक अंकांनी खाली आला. नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतरही घसरगुंडी कायम राहिली. एका टप्प्यावर सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, तर निफ्टी 324 अंकांनी खाली व्यवहार करत होता.

Oil Prices: तेलदरवाढीचा बाजारावर परिणाम

इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. आशियाई व्यवहारात Brent Crude तब्बल 13 टक्क्यांपर्यंत वाढला. नंतर किंमत काहीशी स्थिर झाली असली तरी टोकियो वेळेनुसार दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सुमारे 5 टक्क्यांनी वाढून 76.48 डॉलर प्रति बॅरलवर होता. तेलदरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती असून भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो.

Share Market: आशियाई आणि अमेरिकन बाजारातही पडझड

आशियाई बाजार देखील घसरणीसह खुले झाले. हाँगकाँगचा Hang Seng Index सुमारे 2 टक्क्यांनी खाली आला, तर जपानचा Nikkei 225 निर्देशांक सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरला. अमेरिकेतही नियमित व्यवहारांपूर्वीचे स्टॉक फ्युचर्स घसरले. S&P 500 आणि NASDAQ Composite यांना ट्रॅक करणारे फ्युचर्स सुमारे 0.7 टक्क्यांनी खाली होते. यामुळे वॉल स्ट्रीटवरही अस्थिर व्यवहार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Share Market: गुंतवणूकदार सावध भूमिकेत

जागतिक तणाव, तेलदरवाढ आणि संभाव्य महागाईचा दबाव या तिहेरी परिणामामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. संघर्ष अधिक तीव्र झाल्यास बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस जागतिक घडामोडींवरच बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आणखी वाचा 

Oil Prices: ज्याची भीती होती तेच घडलं... जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ; भारतावर काय होणार परिणाम?

PM Narendra Modi: इस्रायल-अमेरिका-इराण संघर्ष विकोपाला, पंतप्रधान मोदींचा नेतन्याहूसह यूएईच्या अध्यक्षांना फोन; म्हणाले, शत्रुत्व लवकर थांबवा..

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget